रोजा चित्रपटातील अभिनेत अरविंद स्वामी आणि अभिनेत्री मधू यांची जोडी लोकांना खूप आवडली होती. मधूचं साधेपणा लोकांना भावला होता.

आता 31 वर्षांनी मधू कशी दिसते, काय करते असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. नुकतेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

व्हायरल होणारे फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. मधू आता 54 वर्षांची असून आजही तितकीच सूंदर आणि फिट आहे.

मधू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि आपले फोटो ती शेअर करत असते. तिने आपलं वजन बरंच कमी केलं असून तिच्या सौंदर्यात आणखी बर पडली आहे.

मधू 2 मुलांची आई आहे. तिला दोन मुली आहेत, यातल्या मोठ्या मुलीचं वय 23 तर लहान मुलीचं वय 21 वर्ष आहे.

रोजा चित्रपटानंतर मधूने अनेक चित्रपटात काम केलं. अजय देवगन आणि अक्षय कुमारबरोबरची तिची जोडी लोकांना आवडली होती.

दिलजले, ऐलान हे तिचे चित्रपट चांगलेच गाजले. पण तिची बॉलिवूड कारकिर्द फार काळ टिकली नाही. तीने सतीश शाहबरोबर लग्न केलं आणि इंडस्ट्रीला बायबाय केलं.

VIEW ALL

Read Next Story