बहुचर्चित 'बडे मियां छोटे मियां' चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या मिस्टर खिलाडी अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांबरोबर एक गुडन्यूज शेअर केली आहे.
पत्नी ट्विकल खन्नाबरोबरचा एक फोटो शेअर करत अक्षय कुमारने आपण खूप खुश असल्याचं म्हटलं आहे. या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विकल खन्नाने वयाच्या पन्नशीत ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. याचा फोटो अक्षय कुमारने शेअर केला आहे.
अक्षय कुमारने शेअर केलेल्या फोटोत ट्विंकल खन्नाने हिरव्या रंगाच्या साडीवर पदवीदान समारंभातील आऊटफिट परिधान केला आहे.
ट्विकल खन्नाच्या ग्रँज्युएशनवर अक्षय कुमार प्रचंड खुश आहे. फोटोतही त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपलेला नाही.
या फोटोबरोबर अक्षय कुमारने पत्नीसाठी भावूक करणारी पोस्ट लिहिली आहे. दोन वर्षांपूर्वी ट्विंकलने पुन्हा अभ्यास करायचा असल्याचं सांगितंल होतं, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.
घर, करियर, माझी आणि मुलांची काळजी घेत विद्यार्थी जीवन जगलीस, मला एका सुपरवुमनशी लग्न केल्याचा अभिमान आहे, असंही अक्षय कुमारने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.