एशिया कपच्या सुपर-4 सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तान वेगवान गोलंदाजांची अक्षरश पीसं काढली. विशेषत: विराट कोहली आणि केएल राहुलच्या झंझावातासमोर पाक संघ पाल्यापाचोळ्या सारखा उडून गेला

विराट कोहली आणि केएल राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी तब्बल 233 धावांची पार्टनरशिप केली. दोघांनीही शानदार शतक झळकावलं

विशेष म्हणजे विराट आणि राहुल दोघांच्या पत्नी बॉलिवूड अभिनेत्री आहेत. साहजकिच पतीची कामगिरी पाहून दोघीही प्रचंड खुश होत्या.

विराटने 122 धावांची नाबाद खेळी केली. शतकानंतर विराटची विनिंग पोझ अनुष्काने कॅमेरात कैद केली. हा फोटो तीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

विराटचा शतकानंतरचा फोटो ट्विट करत अनुष्काने एक सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. यात तीने म्हटलंय 'सुपर नॉक, सुपर मॅन'

तर केएल राहुलनेही 111 धावांची शानदार खेळी केली. आपल्या पतीच्या कामगिरीवर पत्नी अथिया शेट्टीनेही एक पोस्ट शेअर केली आहे.

अथिया शेट्टीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, अंधाऱ्या रात्रीचाही शेवट असतो आणि यशाचा सूर्य उगवतो, तू सर्व काही आहेत, आय लव यू.

विराट कोहलीने शतकाबरोबरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा टप्पा पार केला. तर मोठ्या दुखापतीनंतर केएल राहुलने संघात दमदार पुनरागमन केलं.

VIEW ALL

Read Next Story