अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा यांच्या लग्नाला दीड महिना झालाय. परिणीति सध्या आपलं मॅरिड लाईफ एन्जॉय करतेय.

काही दिवसांपूर्वीच परिणीति चोप्रा मालदीवच्या ट्रीपवर गेली होती. यावेळचे फोटो तीने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले होते.

आपल्या गर्ल गँगबरोबर परिणीति मालदीवला गेली होती. आता मालदीव ट्रीपचे आणखी काही फोटो परिणीतिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

परिणीतिबरोबर मालदीव ट्रीपवर तिची आई आणि सासूदेखील होत्या. या फोटोत परिणीतिने बिकनी परिधान केली आहे. त्यावर लॉंग श्रग कॅरी केलंय.

परिणीतीने हे फोटो पोस्ट करत त्यावर एक कॅप्शनही लिहिला आहे. जेव्हा तुम्ही गर्ल्स ट्रीपवर जाता आणि तुमच्याबरोबर आई आणि सासूही असते.

शिटी वाजवा, चीअर करा आणि अवॉर्ड द्या या गर्ल गँगसाठी, असंही परिणीतिने म्हटलं आहे.

परिणीतिच्या फोटोवर युजर्सच्या कमेंट येत आहेत. सासूसमोर बिकनी, ही चांगली गोष्ट नाही असंही युजर्सने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story