अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने रश्मिकाचा बोल्ड अवतारातला व्हिडिओ बनवण्यात आलाय.

पण फेक फोटो आणि व्हिडिओजचा हा प्रकार थांबवण्याचं नाव घेत नाहीए. आता कतरीना कैफच्या एका फोटोबरोबर छेडछाड करण्यात आली आहे.

सलमान खान आणि कतरीना कैफच्या आगामी टायगर-3 मध्ये कतरीना कैफचा एक टॉवेल फाईट सीन आहे. याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कतरीना कैफच्या या टॉवेल फाईट सीन फोटोचा टेक्नोलॉजीच्या मदतीन गैरप्रकार करण्यात आला आहे. आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय

कतरिनाचा हा फेक फोटो व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. युजर्सने सायबर क्राईममध्ये तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला आहे.

या फेक फोटोवर युजर्सने संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने यावर लगामन घालण्याची गरज असल्याचं म्हटंलय. तर एकाने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

बिग बजेट चित्रपट टायगर-3 हा चित्रपटा येत्या 12 नोव्हेंबरला देशभरात प्रदर्शित होत आहे. शाहरुखच्या जवान, पठाण चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करण्यासाठी टायगर-3 सज्ज झालीय.

VIEW ALL

Read Next Story