अभिनेता आमिर खानने आपल्या घरी कव्वाली नाईटचं आयोजन केलं होतं. यासाठी प्रसिद्ध कव्वाली ग्रुप अली ब्रदर्स यांना बोलवण्यात आलं होतं.

या कार्यक्रमात अनेक सिलिब्रेटी सहभागी झाले होते. अली ब्रदर्सच्या कव्वालीवर अमिर खानसह उपस्थित नाचताना दिसत आहेत.

या कार्यक्रमात टीम इंडियाचा क्रिकेटर शिखर धवनही सहभागी झाला होता. अली ब्रदर्सने आपल्या गाण्यांनी माहोल तयार केला.

या कार्यक्रमात क्रिकेटर शिखर धवन गाणी एन्जॉय करताना दिसतोय. त्याने काही गाण्यांवर नोटाही उडवल्याचं दिसतंय.

आमिर खानचा चित्रपट राजा हिंदुस्तानीमधील परदेसी परदेसी हे गाण्यावर अली ब्रदर्सने जोरदार परफॉर्मन्स दिला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याआधी 2023 च्या दिवाळीत सलमान खानने अली ब्रदर्सच्या कार्यकर्माचं आयोजन केलं होतं. सलमानने अली ब्रदर्सबरोबर फोटोही शेअर केला होता.

अली ब्रदर्स हे तीन भाऊ आहेत. ते मुळचे पंजाबचे असून कव्वालीबरोबरच त्यांनी बॉलिवुडमध्येही अनेक गाणी गायली आहेत.

VIEW ALL

Read Next Story