जेव्हा सुनील आणि नर्गिस दत्त आई-वडील होणार होते, तेव्हा त्यांनी वृत्तपत्रात एक जाहिरात देऊन वाचकांना बाळाचे नाव सुचवायला सांगितल होते. त्यापैकी, नर्गिस यांना 'संजय' हे नाव खूप आवडले होते.
2013 मध्ये जेव्हा संजय दत्तला अटक करण्यात आली तेव्हा त्याला इतर कैद्यांप्रमाणेच कामे देण्यात आली होती. तुरुंगात असताना, त्याला कागदी पिशव्या बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती ज्यासाठी त्याला दररोज 50 रुपये पगार मिळत होता.
2016 मध्ये संजय दत्तची तुरुंगातून सुटका झाली तेव्हा त्याची एकूण कमाई 30,000 डॉलर्सपेक्षा जास्त होती पण त्यातील बहुतांश रक्कम त्याने जेलमध्ये खर्च केल्यामुळे त्याच्याकडे फक्त 450 रुपये शिल्लक राहिले होते.
संजय दत्तने त्याच्या कारकिर्दीत दोनदा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला आहे. वास्तव आणि मुन्ना भाई M.B.B.S मधील अभिनयासाठी त्याला पुरस्कार मिळाले होते.
पहिल्याच चित्रपटादरम्यान त्याला ड्रग्जचे व्यसन लागलं होतं. काश्मीरमध्ये शूटिंगसाठी जात असताना, त्याने लपवून1 किलो हेरॉईन नेले होते होते.
संजय दत्तने पहिली सिगारेट फक्त 9 वर्षांचा असताना प्यालली होती. संजय दत्त अॅश ट्रेमधून सिगारेट घेऊन पिऊ लागला म्हणून वडिलांनी त्याला एका खोलीत नेले आणि बूटाने मारहाण केली.
शालेय शिक्षण घेतल्यानंतर संजय दत्तला मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कॉलेजच्या दिवसांतच त्याला अमली पदार्थांचे व्यसन जडले.
संजय दत्तने कॉलेजमध्येच ठरवलं की त्याला अभिनेता व्हायचे आहे. कारण त्याला ते सोपे काम वाटत होते. जेव्हा त्याने हे सुनील दत्त यांना सांगितले तेव्हा त्यांना खूप राग आला. चित्रपट करण्याआधी त्यांनी संजयला दोन वर्षांचे प्रशिक्षण घ्यायला लावले. (सर्व फोटो - reuters)