दीपिकाच्या गळ्यातील राणी हारावर खिळल्या सर्वांच्या नजरा...

अभिनेत्री दीपिका पादुकोणचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या लुकमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने संपुर्ण बॉलिवुड वर राज्य करणाऱ्या दिपीकाचा हा नवा लुक सध्या खुप चर्चेत आहे.

अवॉर्ड शोच्या निमित्ताने बॉलिवुडमधील सर्व कलाकार मंडळींनी हजेरी लावली. या सर्वांमध्ये दीपिकाच्या साडीतल्या लुकने सर्वांच लक्ष वेधलं.

साडीमध्ये अभिनेत्रीचं सौदर्य फुलून दिसत आहे. पण अभिनेत्रीच्या गळ्यातील राणी हारावर सर्वांच्या नजरा येवून थांबल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त दीपिका हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

दीपिकाने इव्हेंटमध्ये प्रवेश करताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. दीपिकाने निळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

दीपिकाने साडीसोबत अगदी सिंपल लूकसोबत सिम्पल हेअरस्टाईल केली होती. तिच्या कानात सुंदर झुमके होते आणि गळ्यात राणी हार घातला होता.

2023 हे वर्ष दीपिकाने खुप गाजवलं. जवान, पठाण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

येत्या नव्या वर्षात दीपिकाचा फायटर हा नवा चित्रपट येतोय. ह्रतिक रोशन आणि दीपिका पदुकोणची नवी केमिस्ट्री पहायला मिळणार आहे.

VIEW ALL

Read Next Story