मृणाल ठाकूर / इन्स्टाग्राम

मृणालनं शेअर केले फोटो आणि तिचा हा लूक तुम्हासा कसा वाटला? (सर्व छायाचित्र- मृणाल ठाकूर / इन्स्टाग्राम)

May 18,2023

सेलिब्रिटींचे स्टाईल स्टेटमेंट

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर ध्रुव कपूरच्या कलेक्शनमधून मृणालनं हा लूक पसंत केला होता.

तिचे फोटो आणि कॅप्शन...

"I didn't come this far to only come this far. #YesICannes असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलं आणि कारकिर्दीतील हा टप्पा सर केला.

एका क्षणात फोटो व्हायरल

कान्सच्या रेड कार्पेटवर येण्यापूर्वीच मृणालनं काही फोटो काढले आणि उत्सुकतेपोटी ते सोशल मीडियावर शेअरही केले. एका क्षणात तिचे हे फोटो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवून गेले.

आऊटफिटला साजेसा मेकअप

डार्क रंगाच्या आऊटफिटला साजेसा मेकअप तिनं केला होता. यामध्ये डोळ्यांचा मेकअप अधिक बोलका आणि लक्षवेधी होता.

खास लूक

कान्ससाठी जाण्याचं हे तिचं पहिलंच वर्ष. त्यामुळं तिनं अशाच एका खास लूकला पसंती दिली होती. मृणालनं काळ्या रंगाच्या कॉर्सेटवर चमकदार सिक्वीन जॅकेट घातलं होतं. काळ्या रंगाचीच जाळीदार बेलबॉटम तिच्या लूकला उठावदार करत होती.

मृणाल ठाकूर

ही अभिनेत्री म्हणजे, मृणाल ठाकूर. मुळची धुळ्याची मृणाल मालिका विश्वातून थेट रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचली आणि तिनं मेहनतीच्या बळावर जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली.

मराठमोळं नाव

ईशा गुप्ता, सारा अली खान, मानुषी छिल्लर यांच्यासोबतच एक मराठमोळं नावही यावेळी चर्चेत आलं. चक्क महाराष्ट्राच्या लेकीनं कान्सपर्यंत मजल मारणं ही मराठमोळ्या चाहत्यांसाठीही मोठी बाब.

काही नवी नावं

भारताकडूनही बरीच सेलिब्रिटी मंडळी या सोहळ्यासाठी दरवर्षी फ्रान्सला पोहोचतात. यंदाच्या वर्षी त्यामध्ये काही नवी नावं जोडली गेली.

Cannes 2023

मै नही तो कौन बे? महाराष्ट्राची लेक गाजवतेय फ्रान्सचं Cannes

VIEW ALL

Read Next Story