सारा रेड कार्पेटवर आली आणि तिनं एका स्मितहास्यात सर्वांनाच घायाळ केलं. सोशल मीडियावरही तिच्याच लूकला पसंती मिळाली. तुम्हाला या तिघींपैकी कोणाचा लूक सर्वात जास्त आवडला?
या संधीचं सोनं करत तिनं कान्सच्या रेड कार्पेट इवेंटसाठी अबु जानी आणि संदीप खोसला या फॅशन डिझायनर जोडीच्या लेहंग्याला पसंती दिली. डोक्यावरून घेतलेली ओढणी लांबलचक असल्यामुळं तिचा हा लूक to the mark ठरत होता.
ऑफव्हाईट आणि सोनेरी अशा रंगांची सांगड असणारा लेहंगा परिधान करणारी ही अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. साराच्या कारकिर्दीत भारताचं प्रतिनिधीत्वं करण्यासाठी मिळालेली ही एक मोठी संधीच.
मानुषी आणि ईशाचं हे सौंदर्य वाखाणण्याजोगं होतं. कान्ससाठी त्यांनी वापरलेले गाऊनही स्टाईल स्टेटमेंट देणारे ठरले. पण, त्यांच्यावर मात करणारी एक अभिनेत्रीही तिथंच होती.
जाळीदार कपड्याच्या स्ट्रॅपलेस गाऊनला तिनं पसंती दिली होती. मोकळे केस आणि ड्रेसला क्रॉस कॉम्बिनेशन करत गळ्यात घातलेला एक हिरव्या रंगाचा नेकले तिचा लूक आणखी उठावदार करत होता.
जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेमध्ये बाजी मारणाऱ्या मानुषी छिल्लरनंही यंदाच्या कान्स रेड कार्पेटवर फॅशन विश्वाच्या नजरा वळवल्या. तिच्यासाठी हा एक खास आणि तितकाच मोठा क्षणही होता.
सॉफ्ट पिंक शेडमधील थाय हाय स्लिट गाऊनला तिनं या रेड कार्पेट इवेंटसाठी पसंती दिली. मिनिमल ज्वेलरी आणि साजेशी हेअरस्टाईल तिच्या लूकला चार चांद लावून गेले.
बोल्ड अदा आणि मादक सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या याच ईशानं यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये पहिल्यांदा प्रवेश केला. ती रेड कार्पेटवर आली आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.
गेल्या काही काळापासून कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी नसतानाही अभिनेत्री ईशा गुप्ता हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच चाहत्यांना वेड लावलं.
रिव्हीलिंग गाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीनं गाठलं Cannes 2023 चं रेड कार्पेट आणि पुढे...