'अनेक मूड्स...', आलिया भट्टच्या मिरर सेल्फीने वेधलं लक्ष

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून आलिया भट्टला ओळखले जाते. तिचा भारतातच नाही तर जगभरात मोठा चाहतावर्ग आहे.

आलिया भट्टने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे आलिया ही कायमच टॉप अभिनेत्रींच्या यादीत पाहायला मिळते.

आलियाचे इन्स्टाग्रामवर 82.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. नुकतंच तिने नवीन वर्षाच्या सुट्ट्यादरम्यानचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोत आलिया ही विविध लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

यात तिने मिरर सेल्फी शेअर केले आहेत. यात तिने नवीन वर्षाच्या सुट्टीची झलक दाखवली आहे.

यातील एका फोटोत आलियाने गुलाबी रंगाची मोनोकनी परिधान केल्याचे दिसत आहे. तर इतर फोटोत आलियाने स्विमसूट परिधान करत फोटो पोस्ट केले आहेत.

तसेच आलिया ही फिटनेस प्रेमी असल्याने तिने जिममधील एक मिरर सेल्फीही शेअर केला आहे.

आलियाने हे फोटो पोस्ट करत तिने त्याला हटके कॅप्शन दिले आहे. "अनेक मूड्स आणि लाखो मिरर सेल्फी", असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

VIEW ALL

Read Next Story