रामायण फेम अरुण गोविल हे मेरठ लोकसभा मतदार संघातून लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत.
भाजपाने अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे. अरुण गोविल यांनी रामायणात प्रभु रामाची भूमिका साकारली होती.
अरुण गोविल यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीचीही माहिती समोर आली आहे.
अरुण गोविल यांच्याकडे मर्सिडिज कार आहे. त्याचबरोबर 14 लाखांहून अधिक कर्जदेखील आहे
अचल संपत्तीतून पुण्यात एक प्लॉट आहे तर मुंबईत अंधेरी वेस्ट येथे दोन फ्लॅट आहेत.
अरुण गोविल यांच्याकडे 375000 रुपयांची रोकड, पत्नी लेखा अरुण गोविल यांच्याकडे 4,07,500 रुपयांची रोख रक्कम आहे. अरुण गोविल यांच्या अकाउंटमध्ये 1,03,49,071 तर, पत्नीच्या बँक खात्यात 80,43,149 अशी रोख रक्कम आहे.
त्यांच्याकडे 2,82,18,828 रुपयांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर आहेत. त्यांनी अॅक्सिस बँकेतून 14 लाखांचे कार लोन घेतलं आहे.
अरुण गोविल यांच्याकडे 62,99,000 रुपयांची मर्सिडीज कार असून 220 ग्रॅम सोनं आहे. तर, त्यांच्या पत्नीकडे 600 ग्रॅम सोनं आहे.
अरुण गोविल यांच्याकडे एकूण चल संपत्ती 3 कोटी 19 लाख 75 हजार रुपये आहे. पत्नी लेखा अरुण गोविल यांच्याकडे 2 कोटी 76 लाख 65 हजार रुपयांची चल संपत्ती आहे.
त्यांची एकूण अचल संपत्ती 5 कोटी 67 लाख 50 हजार इतकी आहे.