रोमँटिक वेब सीरिज

चला, तुमचा हा वीकेंड थोडा रोमँटिक करूया. जिथं तुम्ही जोडीदारासोबत बसून Best Indian Romantic Web Series पाहू शकता. तुम्हाला यासाठी कुठेही शोधाशोध करायची गरज नाही. ही पाहा सीरिजची यादी....

लिटील थिंग्स

काव्या आणि ध्रुव या तरुण जोडीची ही गोष्ट. लिव्ह इनमध्ये राहणारे हे दोघं जेव्हा कामाच्या निमित्तानं एकमेकांपासून दुरावतात, पुन्हा एकत्र येतात यामध्ये त्यांचं नातं कसं बहरतं यावर सीरिजच्या दोन भागांमधून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

मिसमॅच्ड

प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफ यांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या सीरिजमध्ये नव्या युगातील जोडीचं नातं दाखवण्यात आलं आहे.

परमनंट रुममेट्स

सुमीत व्यास आणि निधी सिंग यांच्या भूमिकांमुळे Permanent Roommates ही सीरिज प्रचंड गाजली. या सीरिजचे दोन्ही भाग म्हणजे मनोरंजनाची परवणी.

ब्रोकन अँड ब्युटीफूल

विक्रांत मेस्सी आणि हरलिन सेठी यांच्या भूमिकांनी ही वेब सीरिज गाजली. ज्या निमित्तानं ते एकत्र येतात ते कारण सोडून हे दोघं एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात यावर भाष्य करण्यात आलं आहे.

सोलमेट्स

शिलाँगला फिरता फिरता एक वर्गमित्र आणि एक वर्गमैत्रीण नेमके कसे भेटतात आणि नकळतच त्यांच्यातलं नातं कसं बहरतं हे अतिशय सुरेखपणे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे.

बंदीश बँडीट्स

ही एक संगीतमय प्रेमकथा आहे. विविध कुटुंबातून आणि वर्तुळातून आलेल्या दोन गायकांमधलं नातं इथं उलगडलं गेलं आहे.

ताज महाल 1989

प्रेम ज्यावेळी अतिशय निस्वार्थ आणि निर्मळ होतं त्या गतकाळातील अनोखी कथा या सीरिजमधून साकारण्यात आली आहे.

मॉडर्न लव - मुंबई, हैदराबाद, चेन्नई

नावावरूनच लक्षात आलं असेल की या सीरिजमध्ये प्रेमाची बदललेली परिभाषा आणि संकल्पना दाखवण्यात आली आहे. लहानलहान एपिसोडमुळं एकाच वेळी इथं बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत.