मराठी साहित्याला आजरामर कलाकृती देणाऱ्या या दिग्गजांचे बायोपिकस् नक्की बघा

Sep 20,2024

बालगंधर्व

2011 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रसिद्ध मराठी गायक, अभिनेते 'नारायण श्रीपाद राजहंस' यांच्या आयुष्यावर आधारित आहे. लोकमान्य टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली होती. स्त्रीव्यक्तीरेखा साकारणारा पहिला पुरुष अभिनेता, म्हणून त्यांची ख्याती आहे. चित्रपटात बालगंधर्वांची भूमिका सुबोध भावेने साकारली आहे.

हरिश्चंद्राची फॅक्टरी

'भारतातील चित्रपटाचे जनक' असे ज्यांना मानले जाते, अशा दादासाहेब फाळकेंच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. 1913 ला प्रदर्शित झालेल्या, राजा हरिश्चंद्र या चित्रपटासाठी फाळकेंनी केलेली खटाटोप, संघर्ष या चित्रपटात बघायला मिळतो. 2009 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात नंदु माधव, विभावरी देशपांडे आदी. कलाकार आहेत.

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

काशिनाथ घाणेकर हे मराठी रंगभूमीवरील फार मोठे नाव आहे. एकेकाळी घाणेकरांच्या एका झलकेसाठी, चाहते कोणत्याही थराला जात होते. त्यांना मराठीतले पहिले सुपरस्टार असे म्हटले जाते. त्याच सुपरस्टारचा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे. त्यांच्या पत्नी कांचन घाणेकर यांनी लिहिलेल्या, 'नाथ हा माझा' या पुस्तकावर सिनेमा आधारित आहे.

भाई व्यक्ती की वल्ली

अवघ्या महाराष्ट्राला हसवणाऱ्या पु.लं.देशपांडेंच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दोन भाग आहेत. पु.लं नी नाटक, सिनेमा, संगीत, लेखन आदी. सर्वच क्षेत्रांमध्ये योगदान दिले आहे. भाई मध्ये सागर देशमुख यांनी पु.लं ची भुमिका साकारली आहे.

मी वसंतराव

भारतातील नावाजलेले शास्त्रीय संगीतकार वसंतराव देशपांडे, यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे.हा 2022 ला प्रदर्शित झाला. वसंतरावांची भुमिका त्यांच्याच नातवाने, म्हणजेच राहुल देशपांडे यांनी साकारली आहे. शास्त्रीय संगीतातील वसंतराव हे अजरामर नाव आहे. परिवारासह हा सिनेमा नक्की बघा.

VIEW ALL

Read Next Story