लवकरात लवकर 250 कोटी कमावणाऱ्या चित्रपटांमध्ये रणबीरच्या 'ॲनिमल'नं नवा रेकॉर्ड केला आहे.
या चित्रपटातील गाण्यानं 'अर्जन वैली' वेधलं सगळ्यांचं लक्ष.
या गाण्यात असलेला महत्त्वाचा अर्जन वैली कोण आहे याविषयी कोणाला माहित नाही. अर्जन वैली हा शीख समाजातील महान योद्धा हरि सिंह नलवा यांचा मुलगा होता.
अर्जन वैली यांचा जन्म लुधियानाजवळील काउंके गावात झाल्याचे म्हटले जाते. त्यांचे वडील हरि सिंह महाराजा रंजीत सिंहच्या खालसा फौजचे महान नायक होते आणि त्यांच्या धाडसाची इतिहासात नोंद आहे.
हरि सिंह यांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या सिंहालाही त्यांनी खंजीर खुपसून मारले होते. तर त्यांना दोन मुलं असून अर्जन वैली आणि जवाहर सिंह अशी होती.
अर्जन सिंग आणि जवाहर हे दोघे ब्रिटीश राज्यकर्त्यांविरोधात लढले होते. वडिलांप्रमाणेच ते धाडसी होते. त्या
गाण्यात असलेल्या वैली शब्दाचा अर्थ हा योद्धा जो युद्धाला घाबरत नाही असं म्हटलं जातं. त्यांच्या शौर्याची गाथा ही या गाण्यात करण्यात आली. तर हे गाणं पंजाबी गायक भूपिंदर बब्बल यांनी गायलं आहे. (All Photo Credit : Social Media)