कॉन्सर्टमध्ये आहे व्यस्त

अरिजीत हा सध्या त्याच्या कॉन्सर्ट्समध्ये व्यस्त आहे. त्यानं त्याची टूर सुरु केली असून तो विविध ठिकाणी त्याचे कॉन्सर्ट करत असल्याचे दिसत आहे. (All Photo Credit : Arijit Singh Instagram)

अरिजीतनं गायलंय पठाणमध्ये गाणं

अरिजीतनं शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटात गायलंय झुमे जो पठाण हे गाणं. तर 'जवान' या चित्रपटात देखील तो गाणं गाणार आहे.

नागरिकांसाठी पर्यायी मार्ग कोणते?

ते रस्ते बंद असल्यानं नागरीक हे प्रोझोन मॉलकडून कलाग्राम गरवारेकडे येणारी वाहतूक हॉटेल द पलमस मार्गे नारेगाव रोड मार्गे पुढे जातील.

पोलिसांनी घेतली काळजी

या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज दुपारी दोन वाजेपासून रात्री दहा पर्यंत गरिबारी स्टेडियम कॉर्नर क्रांती गुरु लहुजी साळवे चौक ते कलाग्राम पूजन मॉल कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूनं येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याची माहिती, प्रभारी सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक शाखा) दिलीप गांगुर्डे यांनी दिली.

अरिजीतच्या कार्यक्रमात इतके प्रेक्षक लावणार

अरिजीतच्या या कार्यक्रमात तब्बल दहा हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अरिजीतला पाहण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता

अरिजीतला या कॉन्सर्टमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होण्याची शक्यता अशा परिस्थितीत पोलिसांनी यासाठी आधीच चांगली खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कुठे आहे अरिजीतचा कॉन्सर्ट?

अरिजीतचा हा कॉन्सर्ट यश ग्लोबल नारेगाव रोड गरवारे स्टेडियमजवळ आयोजित करण्यात आलेला आहे.

VIEW ALL

Read Next Story