'अ‍ॅनिमल'साठी कोणी किती पैसा घेतला? समोर आली थक्क करणारी आकडेवारी

Swapnil Ghangale
Dec 03,2023

130 कोटींची कमाई

'अ‍ॅनिमल' चित्रपटाने 2 दिवसांमध्ये 130 कोटींची कमाई केली आहे.

सुपरहीट

'अ‍ॅनिमल' चित्रपट सुपरहीट ठरला आहे.

तिकीटबारीवर सुसाट कामगिरी

संदीप वांगा रेड्डीने दिग्गदर्शित केलेला हा चित्रपट तिकीटबारीवर सुसाट कामगिरी करत असून अनेक विक्रम त्याने मोडलेत.

रश्मिका रणबीरची प्रेयसी

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधानाने 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीरच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.

रश्मिकाने किती मानधन घेतलं

'अ‍ॅनिमल' चित्रपटाची मेन हिरोईन म्हणून रश्मिकाने तब्बल 4 कोटींचं मानधन घेतलं आहे.

बॉबी देओल व्हिलन

अभिनेता बॉबी देओलने या चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारली आहे. टिझरमध्येच बॉबीचा लूक चाहत्यांना आवडला होता.

बॉबीने किती मानधन किती घेतलं?

बॉबी देओलने 'अ‍ॅनिमल'मधील व्हिलन साकारण्यासाठी 4 कोटींचं मानधन घेतल्याचं समजतं.

तृप्ती दिमरीनेही साकारली भूमिका

अभिनेत्री तृप्ती दिमरीनेही या चित्रपटामध्ये सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.

तृप्तीने किती मानधन घेतलं?

तृप्तीने या भूमिकेसाठी 40 लाखांचं मानधन घेतलं आहे.

अनिल कपूर यांनी साकारली रणबीरच्या वडिलांची भूमिका

एव्हरग्रीन अभिनेता अशी ओळख असलेल्या अनिल कपूर यांनी 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूरच्या वडिलांची म्हणजेच बलबीर सिंहची भूमिका साकारली आहे.

अनिल कपूर यांचं मानधन किती?

अनिल कपूर यांनी बलबीर सिंहच्या भूमिकेसाठी 2 कोटींचं मानधन घेतलं आहे.

प्रमुख भूमिकेत रणबीर

'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीर कपूरने प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याची भूमिका ट्रेलरमध्येच लोकांना फार पसंत पडली.

रणबीरच्या भूमिकेचं कौतुक

प्रत्यक्षात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही रणबीरने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक होतं आहे.

रणबीर कपूरचं मानधन किती?

'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरने 70 कोटी मानधन घेतल्याचं समजतं.

VIEW ALL

Read Next Story