तमन्ना भाटियाचे मुंबईतील 16 कोटींचे घर, पाहा इंटीरियर्स

यशस्वी अभिनेत्री

तमन्ना भाटिया ही सध्याच्या पिढीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. सौजन्य - Tamannaah Bhatia instagram

मोठे फिश टँक

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने मुंबईत आलिशान घर घेतले आहे. तमन्ना भाटिया हिच्या 16 कोटी रुपयांच्या मुंबईतील घरात मोठे फिश टँक ते मॉर्डन इंटीरियर्स पाहायला मिळते. सौजन्य - Tamannaah Bhatia instagram

14व्या मजल्यावर घर

मुंबईतील जुहू-वर्सोवा लिंक रोडवर असलेल्या 'बेव्ह्यू अपार्टमेंट'च्या 14व्या मजल्यावर तमन्ना भाटिया हे आलिशान घर आहे. 80,778 प्रति चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेल्या या अपार्टमेंटची किंमत तब्बल 16.60 कोटी रुपयांच्या घरात आहे. सौजन्य - Tamannaah Bhatia instagram

घराची सजावट

तमन्ना भाटिया हिने आपल्या घराची सजावट ही आधुनिक आणि अत्याधुनिक इंटिरिअर्ससह केली आहे. सुंदर बनलेली ही मालमत्ता भाटिया हिच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला नक्कीच प्रतिबिंबित करते. सौजन्य - Tamannaah Bhatia instagram

स्वप्नातील घर

तमन्ना भाटिया हिने तिच्या स्वप्नातील घरासाठी जवळपास दुप्पट किंमत मोजल्याचे सांगण्यात येत आहे. सौजन्य - Tamannaah Bhatia instagram

घराच्या किमतीत वाढ

जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील नव्याने खरेदी केलेल्या घराचे अंतर्गत डिझाइन 2 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे घराची किंमत ही 18 कोटी रुपयांच्या जवळपास जात आहे. सौजन्य - Tamannaah Bhatia instagram

मस्त लूक

तमन्ना भाटिया हिच्या या महागड्या अपार्टमेंटच्या प्रत्येक बाजूला समुद्राचे दृश्य दिसते. सौजन्य - Tamannaah Bhatia instagram

ब्लॉकबस्टर बाहुबली

तमन्ना दक्षिण सिनेमातील तिच्या कामासाठी प्रसिद्ध आहे, परंतु ती अजय देवगणच्या हिम्मतवाला रिमेकमध्ये तसेच ब्लॉकबस्टर बाहुबली फ्रँचायझीमध्ये दिसली आहे. सौजन्य - Tamannaah Bhatia instagram

हॉरर-कॉमेडी

भाटिया हिने हॉरर-कॉमेडी चित्रपट देवीचा सिक्वेल देवी 2 मध्ये काम केले आहे. प्रभुदेवा मुख्य भूमिकेत होता. सौजन्य - Tamannaah Bhatia instagram

भव्य फिश टँक

घराच्या दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात भव्य फिश टँक आहे. यात गोल्ड फिश मासा दिसून येत आहे. सौजन्य - Tamannaah Bhatia instagram

VIEW ALL

Read Next Story