सुसाईट नोटमधून धमकी

काही दिवसांपूर्वी पायलने सुसाईट नोटसंबंधी पोस्ट शेअर करताना त्यात तिने आपल्याला सुशांत सिंग राजपूत समजू नका, मी मेल्यानंतर सर्वांना अडकवेन अशी धमकी दिली होती.

अनुराग कश्यपने फेटाळले आरोप

अभिनेत्रीने अनुराग कश्यपविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 2013 मध्ये अनुराग कश्यपने वर्सोव्यात माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. अनुराग कश्यपने मात्र हे आरोप फेटाळले असून त्यांना कधी महत्त्व दिलं नाही.

#MeToo मोहिमेदरम्यानही आरोप

पायल घोषने इतका मोठा आरोप करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने #MeToo मोहिमेदरम्यान अनुराग कश्यपचा उल्लेख करत मोठा आरोप केला होता.

अनुराग कश्यपने बलात्कार केला

अभिनेत्रीने आणखी एक पोस्ट शेअर करत लिहिलं की "मी दक्षिणेत दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकांसोबत काम केलं. त्यांनी मला हात लावला नाही. मी अनुराग कश्यपसोबत काम केलं नाही. पण तिसऱ्याच मुलाखतीत त्यांनी माझ्यावर बलात्कार केला".

अनुराग कश्यपवर आरोप

पायलने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की "मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची खूप मोठी चाहती आहे. तिथे कोणी माझ्यावर बलात्कार केला नाही". या पोस्टनंतर तिने अनुराग कश्यपवर मोठा आरोप केला.

पायल घोषची धक्कादायक पोस्ट

अभिनेत्री पायल घोष वादांमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने आत्महत्येचा उल्लेख केला होता. या पोस्टची चर्चा रंगू लागल्यानंतर तिने ती डिलीट करुन टाकली. दरम्यान तिने सोशल मीडियावर आणखी एक धक्कादायक पोस्ट केली आहे.

VIEW ALL

Read Next Story