इंडस्ट्रीत चांगलं काम मिळत नाही म्हणून देश सोडून जाते 'ही' अभिनेत्री

पल्लवी कुलकर्णी

पल्लवी कुलकर्णी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. पल्लवीनं छोट्या वयापासून स्टेज परफॉर्मन्सपासून सुरुवात केली होती. त्यानंतर तिनं 'इतना करो ना मुझे प्यार'मध्ये भूमिका साकारली होती.

पल्लवीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

त्या मालिकेनंतर पल्लवी कुलकर्णी ही '1962 : द वॉर इन द हिल्स' या वेब सीरिजमध्ये दिसली. आता पल्लवीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.

देश सोडण्याचा निर्णय

पल्लवी कुलकर्णीनं देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक बातमी असली तरी याचं कारण तिला काम न मिळणं असल्याचं म्हटलं जातं.

काम मिळालं तर परत येणार?

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत पल्लवीनं सांगितलं की 'जर तिला कामाची ऑफर मिळाली तरच ती परत येईल. नाही तर नाही.'

मी काम करणं बंद करेन

पल्लवी पुढे म्हणाली की 'छोट्या पडद्यावर इंडस्ट्रीमध्ये मी एक दशकापेक्षा जास्त काम राहिले आहे. पण आता काम करणं बंद करेन. काम आलं तर मी मुंबईला परत येईन. तसं तर मी दुबईला जाते, जे फक्त 2 तासाच्या अंतरावर आहे.'

नवरा दुबईत कामाला

पल्लवीनं याविषयी सांगितलं की 'मी कधीच हा विचार केला नव्हता की मला मुंबई सोडून कुठे जावं लागेल. पण माझ्या नशिबात काही दुसरंच होतं. नवरा दुबईत नोकरी करतो, तर त्याच्या जवळ जाईन.'

लवकर काम मिळेल अशी आशा

पल्लवीनं सांगितलं की 'आशा आहे की लवकरच काही ऑफर येतील. दरम्यान, अनेकांना वाटतं की नवरा आणि मुलासाठी मी दुबईला जाते, पण असं नाही.'

VIEW ALL

Read Next Story