छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मधुराणी प्रभुलकरला ओळखले जाते.

'आई कुठे काय करते' या मालिकेद्वारे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत ती अरुंधती हे पात्र साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

मधुराणी तिच्या सहजसुंदर अभिनयासोबतच लूकमुळेही चर्चेत असते.

मधुराणीने यंदाच्या स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला आहे.

यावेळी मधुराणीने गोल्डन रंगाची साडी परिधान केली होती.

त्याबरोबरच तिने डिझाईनर ब्लाऊज आणि हटके हेअरस्टाईलही केली होती.

मधुराणीने या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर सुकन्या मोने यांनी कमेंट केली आहे.

"अशक्य..... विश्वास बसत नाहीये की ही तू आहेस.... सुंदर", असे सुकन्या मोने यांनी म्हटले आहे. त्यावर मधुराणीने awwwww असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.

VIEW ALL

Read Next Story