अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहमने आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

सोहमने अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आई-वडिलांप्रमाणेच सोहमचा मोठा चाहतावर्गही आहे.

सोहम बांदेकरने एका सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्याच्या स्टायलिश लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

यातील काही फोटोत त्याने ब्लेझर परिधान केला आहे.

तर काही फोटोत तो ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

सोहम बांदेकर हा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ मालिकेतून घराघरांमध्ये पोहोचला. या मालिकेत सोहमने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

अभिनयाबरोबरच सोहमने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेची निर्मिती सोहमने केली आहे.

VIEW ALL

Read Next Story