वाचनाची आवड आहे? 'या' 6 गाजलेल्या कादंबऱ्या, पुस्तकं नक्की वाचा

Aug 27,2024


मराठी साहित्यात लोकप्रिय झालेली ही पुस्तके आणि कादंबऱ्या नक्की वाचा.

ययाति

'ययाति' ही वि.स.खांडेकरांची कादंबरी आहे . हस्तीनापूरच्या राजाविषयीची ही कादंबरी फारच लोकप्रिय ठरली.कादंबरी ला 1960 चा 'साहित्य अकादमी पूरस्कार' 1974 चा 'जनपीठ पुरस्कार' प्राप्त झाला आहे.

मृत्यंजय

शिवाजी सामंतांची 'मृत्यंजय' ही कादंबरी महाभारतातील कर्णाच्या व्यक्तिरेखेच्या आधारे लिहीलेली आहे. 1995 चा 'मूर्तिदेवी पुरस्कार' कादंबरीला मिळाला. कादंबरीची प्रसिध्दी आजही टिकून आहे.

श्यामची आई

साने गुरूजींचे 'श्यामची आई' हे आत्मचरित्र आई या विषयावर लिहीलेल्या पुस्तकाचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक मराठी वाचकाला हे पुस्तक माहिती आहे. पुस्तकावर आधारित विविध चित्रपट-नाटकं प्रदर्शित झाली.

गारंबीचा बापू

प्रसिद्ध लेखक श्री.ना.पेंडसेंची 'गारंबीचा बापू' ही फार साध्या-सोप्या शब्दात मांडलेली कादंबरी आहे. साधे आयूष्य जगणाऱ्यांना कादंबरी फार आपलीशी वाटते.

कोसला

1963 साली प्रकाशित झालेली भालचंद्र नेमाडेंची 'कोसला' ही कादंबरी मराठी साहित्यातील पहिली अस्तित्त्ववादी कादंबरी मानली जाते. कादंबरी जन्म-मृत्यू ,भीती ,परकेपणा सारख्या अस्तित्त्ववादी कल्पनांचा विचार करायला लावते.

बलुतं

दया पवारांचे आत्मचरित्रपर पुस्तक 'बलुतं' हे दलित साहित्यातील लिखाणाचा एक उत्तम नमूना आहे. दलित समाजाने सहन केलेल्या आत्याचारांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन वाचकांसाठी परिणामकारक ठरला.

VIEW ALL

Read Next Story