टीम इंडियाचे क्रिकेटवीर त्यांच्या फिटनेसकडे खूपल लक्ष देतात. असं असलं तरी हे खेळाडू तेवढेच फूडी सुद्धा आहेत.
टीम इंडिया कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला बटर चिकन खायला प्रचंड आवडतं.
हिटमॅन रोहित शर्माने एका मुलाखतीत असं सांगितलं की, त्याला महाराष्ट्रीय जेवण खूप आवडतं. रोहितला कोथिंबीरच्या वड्या खूप आवडतात.
क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिनचं गाव कोकणातलं आहे. त्यामुळे सचिनला मासे आणि खेकडे खायला खूप आवडतात.
शुभमन गीलने एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की, तो पराठे खूप आवडीने खातो.
केएल राहूल असं म्हणतो की, त्याला साऊथ इंडीयन पदार्थ खूप आवडतात. राहूलला डोसा आणि पाणीपुरी खायला खूप आवडतं.
दिल्लीत जन्म झाला असला तरी विराट मूळचा पंजाबी कुटुंबातला आहे. त्यामुळे विराटला छोले भटुरे खायला खूप आवडतात.
जडेजा डाळ भात खाणं पसंत करतो, त्याचबरोबर जडेजाला ढोकळा खायला खूप आवडतं.
युवराजला कॉन्टेनेटल फूड खूप आवडतं. त्याचबरोबर युवराज डाळ भात ही आवडीने खातो.