2024 च्या आयपीएलची चेन्नई सुपर किंग्जने धमाकेदार सुरूवात केली. सलग दोन सामन्यात विजय मिळवून चेन्नईने दमदार कामगिरी केली.
श्रीलंकेचा गोलंदाज मथीशा पाथिराना हा सुद्धा चेन्नईमधून खेळत आहे. पाथिरानाला गंभीर दुखापत झाल्याने तो पहिल्या सामन्यात खेळला नव्हता.
गुजरात टायटन्सच्या विरुद्धच्या सामन्यादरम्यान पाथिराना आणि धोनीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये असं सांगितलं जातंय की, पाथिराना धोनीच्या जवळ जात त्याच्या पाया पडला.
मात्र व्हिडीओत सांगितलं त्यात काही तथ्य नाही. वास्तविक पाहता, पाथिराना बॉलिंग रनअप सेट करण्याकरीता व्हाईट मार्कर बाजूला करत असाताना हा व्हिडीओ काढण्यात आला.
त्यानंतर पाथिरानाने ते व्हाईट मार्कर फेकून दिले. धोनी पाथिरानाच्या खूप जवळ असल्याने हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या गैरसमज झाला.
गुजरात टायटन्सच्या विरुद्धच्या सामन्यात या बेबी मलिंगाने तुफान गोलंदाजी केली होती.
श्रीलंकन खेळाडू मथीशा पाथिरानाची गोलंदाजीची शैली काहीशी लथिस मलिंगाशी मिळती जुळती असल्याने त्याला बेबी मलिंगा असं म्हणातात.
पाथिरानाने 2023 च्या आयपीएलमध्ये 12 सामन्यात 19 विकेट घेतल्या होत्या.