क्रिकेटर रविंद्र जडेजाची संपत्ती जवळपास 15 मिलियन डॉलर (124 करोड रुपये) इतकी आहे. एका रिपोर्टनुसार मागिल 5 वर्षात जडेजाच्या संपत्तीमध्ये 750% वाढ झाली आहे.
रविंद्र जडेजाची वार्षिक कमाई 20 करोड असल्याची शक्यता आहे. देशातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजा हे नाव पुढे आहे.
आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग या टीमकडून जडेजा खेळणार आहे. जडेजाने नुकताचं अहमदाबादमध्ये एक प्लॉट खरेदी केला आहे. याची किंमत जवळपास 8 करोड इतकी आहे.
जडेजाला कार, बाईक , घोडेस्वारीची आवड आहे. त्याच्याकडे ब्लॅक हुंडाई अॅक्सेंट आणि ऑडी A4आहे .
रविंद्र जडेजाजवळ 'हयाबुसा' ही जगातील प्रसिद्ध रेसिंग बाईक सुद्धा आहे.
जडेजाला प्रत्येक टेस्ट match, एकदिवसीय , T20, किंवा आंतराष्ट्रीय क्रिकेट सामान्यांसाठी क्रमशः 15 लाख, 6 लाख, आणि 3 लाख असे पैसे मिळतात.
रवींद्र जडेजाला बीसीसीआय कडुन वर्षाला 7 करोड रुपये मिळतात.
आयपीएल आचार संहितेच्या उल्लंघणामुळे 2010 साली रवींद्र जडेजाला बॅन केलं होतं. "