भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जातोय.
या संपूर्ण सामन्यावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखलं आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतही ऑस्ट्रेलियन संघाने दमदार कामगिरी केली.
भारतीय संघाला मात्र अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. भारताचे प्रमुख फलंदाज सपशेल फ्लॉप ठरले आहेत.
भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीवर भारतीय क्रिकेटप्रेमी संतापले असून आयपीएलला दोष दिला जात आहे.
टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रवी शास्त्री यांनीही आयपीएलवरुन बीसीसीआयसमोर सवाल उपस्थित केला आहे.
बीसीसीआयला प्राथमिकता निश्चित करावा लागणार आहे, टीम इंडिया की आयपीएल हे ठरवावं लागणार असल्याचं शास्त्रींनी म्हटलंय
बीसीसीआयला आयपीएल स्पर्धेला प्राथमिकता द्यायची असेल तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप विसरून जा, असंही शास्त्रींनी सांगितलं.
बीसीसीआयची प्राथमिकता कसोटी क्रिकेट असेल तर आयपीएलबाबत नवे नियम बनवण्याची गरज आहे.
आयपीएल करारात एक नियम असायला हवा, त्यानुसार मोठ्या स्पर्धेआधी खेळाडूंना आयपीएलमधून बाहेर करावं, असं शास्त्रींनी म्हटलंय.
त्यामुळे खेळाडूंना मोठ्या स्पर्धेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि नामुष्की ओढावणार नाही, असा सल्ला रवी शास्त्रींनी दिलाय.