लोकप्रिय क्रिकेट खेळाडू

महेंद्रसिंग धोनी हे नाव क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय नाव. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार

आयपीएलमध्ये यशस्वी कामगिरी

धोनीने आपल्या नेतृत्वाखाली नुकतंच चेन्नईला सुपर किंग्सला आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली.

धोनीचा फोटो व्हायरल

एमएस धोनीचा शाळेतील पुस्तकातील एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

फूटबॉलपटू म्हणून उल्लेख

या फोटोत तीन खेळाडूंचे फोटो आणि त्यांची नावं देण्यात आली आहेत. यात धोनीच्या फोटोखाली फुटबॉलपटू असं लिहण्यात आलं आहे.

नेपाळच्या क्रिकेटरचाही समावेश

नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार ग्यानेंद्र मल्ला याचा उल्लेखही फुटबॉलपटू म्हणून करण्यात आला आहे.

विराटचा उल्लेख क्रिकेटर

एकट्या विराट कोहलीचा उल्लेख क्रिकेटर म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

फोटोवर चाहत्यांचा संताप

धोनीचा उल्लेख फुटबॉलपटू म्हणून केल्यानंतर या फोटोवर चाहत्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

मेसीशी जोडलं नाव

एक चाहत्याने धोनीचं नाव अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेसीशी जोडलं आहे. त्याने मेसी सिंग धोनी असं म्हटलं आहे.

तर फिफाही खेळला असता

एका युजरने म्हटलंय धोनी फुटबॉलपटू असता तर त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एक FIFA वर्ल्ड कप नक्की खेळला असता.

भारतीय क्रिकेटमधलं योगदान

भारतीय क्रिकेटसाठी धोनीचं योगदान मोलाचं आहे. क्रिकेटमधील प्रत्येक महत्त्वाची स्पर्धा टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलीय.