Voting Card : ऑनलाईन डाऊनलोड करा व्होटिंग कार्ड

निवडणूक आयोगाच्या (Eci) अधिकृत वेबसाईटवर जावून व्होटर आयडी कार्डसाठी ऑनलाईन (Voter Id Online Apply) अर्ज करु शकता.

Updated: Nov 10, 2022, 05:52 PM IST
Voting Card : ऑनलाईन डाऊनलोड करा व्होटिंग कार्ड title=

मुंबई : व्होटिंग कार्ड (Voter Id) महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. मतदान (Voting) करण्यासाठी व्होटिंग कार्ड बंधनकारक नसलं तरी ते असणं महत्त्वांच असतं. ओळपत्र म्हणूनही व्होटिंग कार्डला महत्त्व आहे. व्होटिंगचा कार्डचा वापर अनेक ठिकाणी डॉक्युमेंट म्हणून करता येतो. तुम्ही अजूनही जर व्होटिंग कार्ड बनवलं नसेल तर ते ऑनलाईन करु शकता. (voting card news know how to download online epic card also apply)

असं करा ऑलाईन अर्ज

निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जावून व्होटर आयडी कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. अर्जात आवश्यक विचारलेली माहिती अचूक भरा. यानंतर निवडणूक आयोगाकडून तुम्ही दिलेली माहिती तपासली जाईल. सर्व पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन व्होटिंग कार्ड दिलं जाईल.  

ऑनलाईन व्होटिंग कार्ड डाऊनलोड

व्होटिंग कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी nvsp.in या वेबसाईटवर जा. तिथे जर तुमचं अकाउंट असेल तर लॉगिन करा, नसेल नोंदणी करा. यानंतर तुम्हाला व्होटिंग आयडी कार्ड क्रमांक (Epic No) किंवा संदर्भ क्रमांक (Refrence No) टाकावा लागेल. 

ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. आलेला ओटीपी सबमिट करा. यानंतर तुम्ही व्होटिंग कार्ड डाऊनलोड करु शकता. या व्होटिंग कार्डचा उपयोग अनेक ठिकाणी एड्रेस प्रूफ म्हणूनही करु शकता.