नवी दिल्ली : येणारा काळ इलेक्ट्रिक कार आणि बाईक्सचा असणार असं म्हणतात. भारतात देखील इलेक्ट्रिक कार आणि बाईक्स साठीचे इंफ्रास्ट्रक्चर उभे राहत आहे. इलेक्ट्रिक कारांच्या चार्जिंगची मोठी अडचण असते. कारला 6-8 तास चार्जिंगसाठी लागतात. म्हणजे एक रात्र साधारण चार्जिंग करावी लागते. परंतु या चीनी कंपनीने बॅटरी चार्जिंगबाबत अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्यामुळे इलेक्ट्रिक कारची बॅटरी फक्त 10 मिनिटात फुल चार्ज होईल.
GAC ची नवीन बॅटरी चार्जिग तंत्रज्ञान
चीनी कंपनी Guangzhou Automobile Corporation (GAC) ने नुकतीच आपली नवी इलेक्ट्रिक कार Aion V लॉंच केली आहे. या कारमध्ये ग्रेफीन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही कार 8 मिनिटात 80 टक्के चार्ज होऊ शकते. यासाठी साधारण तेवढाच वेळ लागेल जेवढा वेळ पेट्रोल डिझेल भरायला लागतो.
3C फास्ट चार्जरने 16 मिनिटात चार्ज
GAC चे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे 3 C आणि 6 C वर्जन आहे. ज्यामुळे बॅटरी खुपच गतीने चार्ज होते. कंपनीचा दावा आहे की, 3 C फास्ट चार्जरने फक्त 16 मिनिटात 0-80 टक्के चार्ज होते.
कंपनीने दावा केला आहे की, बॅटरी फास्ट चार्जिंग केल्याने खराब होणार नाही.