raj thackrey

नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल - राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. प्रभादेवी इथल्या रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित मुंबई-ठाण्यात पदाधिका-यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

Nov 19, 2016, 02:48 PM IST

ऐ दिल है मुश्किल मनसेचा हिरवा कंदील, शिवसेनेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्कीलच्या रिलीजला मुख्यमंत्री आणि मनसेनं जरी हिरवा कंदिल दिला असला तरी शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध कायम याहे.. चित्रपटाच्या रिलीज संबंधीत झालेल्या बैठकीतील निर्णयावर शिवसेनेनं शंका उपस्थित केल्या आहेत.

Oct 23, 2016, 07:57 AM IST

ऐ दिलबाबत पुढील 48 तासांत भूमिका स्पष्ट करु - राज ठाकरे

'ऐ दिल है मुश्किल'ला विरोध करण्यासाठी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक झाली.

Oct 21, 2016, 03:43 PM IST

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचं आज मनसेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Oct 19, 2016, 04:23 PM IST

मुंबईवरच्या वर्चस्वासाठी ठाकरे बंधुंनी कसली कंबर

मुंबईवर असलेलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ठाकरे बंधुनी कंबर कसली आहे.

Oct 18, 2016, 03:56 PM IST

मनसेचा रेडिओ मिर्चीला इशारा, पाकिस्तानी कलाकराचा कार्यक्रम रद्द

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कलाकारांना ४८ तासात देश सोडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला. यानंतर प्रसिद्ध गायक आतिफ असलमचा कार्यक्रम देखील रोखण्यात आला.

Sep 25, 2016, 02:52 PM IST

मनसेच्या इशाऱ्यानंतर अबू आझमींचे राज ठाकरेंना आव्हान

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जा अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.

Sep 24, 2016, 01:00 PM IST

ऱाज ठाकरेंच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंग्याचं ध्वजारोहण

महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंगा आज पुण्यात फडकला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या तिरंग्याचं ध्वजारोहण झालं. 

Aug 15, 2016, 01:32 PM IST

बसंत कुमार यांचा राज ठाकरेंकडून सन्मान

महाड पूल दुर्घटनेवेळी प्रसंगावधान दाखवत पुढची हानी रोखणारे देवदूत बसंत कुमार यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सन्मान केला. बसंत कुमार यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली.

Aug 10, 2016, 02:16 PM IST

महाडाच्या दुघर्टनेवरून राज ठाकरेंची सरकारवर टीका

महाडाच्या दुघर्टनेवरून सरकारवर कोरडे ओढाणाऱ्यांच्या यादीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालं आहे. आपल्या सरकार पेक्षा ब्रिटिशांना आपली जास्त काळजी होती असा घणाघात आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केलाय. सावित्री नदीवरचा ब्रिटीशांनी बांधलेला पूल मंगळवारी रात्री वाहून गेला. पण यापुल धोकादायक झाल्याची कल्पना ब्रिटीशांनी देऊनही त्याची दखल घेतली गेली नसल्याची तक्रार राज ठाकरेंनी केली आहे.

Aug 4, 2016, 04:51 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवेदन

 शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेय. मात्र  त्याचबरोबर निर्णयाच्या दिरंगाईबद्दल त्यांनी सरकारवर टीकाही केलीये. 

Jul 13, 2016, 02:25 PM IST

नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्यात 'चाय पे चर्चा' होणार ?

४ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा योग पुन्हा जुळून येणार असल्याची माहिती मिळतेय. स्वतः मोदी यांनी राज ठाकरे यांना दिल्ली भेटीचं निमंत्रण दिलंय. गेल्या रविवारी नीट परिक्षेसंदर्भात राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींशी फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी मोदी यांनी हे निमंत्रण दिल्याची माहिती मिळतेय. 

May 17, 2016, 11:01 PM IST