pune municipality

अनधिकृत बांधकामांना झटका, पण राजकीय पक्षांची सुटका!

पुणे शहरात हजारोंच्या संख्येनं अनधिकृत बांधकामं असल्याचे स्पष्ट झालंय. महापालिकेकडील आकडेवारीवरूनच ही माहिती उघड झाली आहे. महापालिका हद्दीत २ हजार ६०० अनधिकृत बांधकामं आहेत. यातील शेकडो बांधकामांवर महापालिकेनं कारवाईदेखील केली आहे. मात्र यातील आश्चर्याची बाब म्हणजे यात एकही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या कार्यालयाचा समावेश नाही.

Feb 19, 2013, 09:02 PM IST

भ्रष्ट अधिकाऱ्यांनो! परत या!

पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांच्या एका आदेशाने सध्या महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा आदेश आहे गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिका-यांना पुन्हा सेवेत घेण्याचा...

Jan 28, 2013, 05:49 PM IST

मनसे कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला साड्यांमधला घोटाळा

पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलजवळच्या महापालिकेच्या गोडाऊनमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. निमित्त होतं महापालिकेच्या साडी खरेदी घोटाळ्याचं.....

Oct 17, 2012, 10:50 PM IST

नगरसेवकांची साडे सहा लाखांची जोडे खरेदी !

महापालिकेच्या क्रीडा स्पर्धांसाठी काही नगरसेवकांनी बूट खरेदी केली आणि तीही तब्बल साडे सहा लाख रुपयांची. त्याचा भुर्दंड अर्थातच पुणेकरांना बसणार आहे.महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांसाठी नगरसेवकांनी तब्बल साडे सहा लाखांचे बूट खरेदी केले आहेत.

Jan 31, 2012, 09:18 PM IST

गडकरी- मुंडे वाद मिटवायला 'समन्वय समिती' !

पुण्यात मुंडे आणि गडकरी गटांतले वाद मिटल्याचा दावा करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादावर तोडगा म्हणून एका समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे, पण समन्वय समित्यांचा इतिहास पाहता त्यांच्यामध्येच समन्वय नसल्याचं समोर आलं आहे.

Jan 12, 2012, 06:20 PM IST

पुणे महापालिकेची 'फाईव्ह स्टार' शाळा

पुणे महापालिकेच्या राजीव गांधी इ-लर्निंग स्कूल हा प्रकल्प लक्ष्यवेधी ठरलाय. या शाळेतल्या विद्यार्थ्यांना फाईव्हस्टार सुविधा पुरवण्यात आल्यात. महापालिकेची ही हाय-फाय शाळा पुण्यात चर्चेच्या विषय बनलीये.

Dec 6, 2011, 07:10 AM IST

कलमाडींचा 'बागूल'बुवा

काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांच्या दालनात आजही कलमाडींचा फोटो जसाच्या तसा आहे. कलमाडींवर घोटाळ्याचे आरोप असले तरी ते सिद्ध झाले नसल्यानं त्यांच्या फोटो कायम ठेवणार असल्याचं समर्थक सांगतात.

Nov 24, 2011, 07:07 AM IST

पुणे महापालिका करणार अण्णांचा सत्कार

पुणे महापालिका अण्णा हजारे यांचा सत्कार करणार आहे. १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी सर्व पुणेकरांच्या वतीनं हा नागरी सत्कार केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेतल्या सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे.

Nov 9, 2011, 11:03 AM IST