आप 'मध्ये तणाव, भूषण-यादव यांची हकालपट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2015, 12:45 PM IST'आप'मध्ये फूट : प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांची हकालपट्टी
आम आदमी पार्टीमध्ये फूट पडली असून प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, प्रा. आनंद कुमार, आनंद झा या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, बैठकीत हाणामारी झाल्याचे भूषण यांनी म्हटले आहे.
Mar 28, 2015, 12:30 PM IST'आप'मधून प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांना बाहेरचा रस्ता!
आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक थोड्याच वेळात सुरु झाली आहे. या बैठकीत प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना पार्टीतून बाहेर काढलं जाण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Mar 28, 2015, 11:17 AM IST'आप'मधून भूषण, यादव यांची हकालपट्टी करा - ६० आमदार
प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची आता राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही हकालपट्टी व्हावी, अशी मागणी करणारं पत्र ६० आमदारांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवलंय. दरम्यान, महाराष्ट्रातल्या आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खळबळ उडवून दिलीय.
Mar 11, 2015, 08:51 PM ISTयादव, भूषण यांची उचलबांगडी केजरीवालांमुळेच - मयांक गांधी
प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची उचलबांगडी करत अंतर्गत संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आपकडून केला जात असतानाच आता मयांक गांधी यांनी ब्लॉगद्वारे आपमधील संघर्ष चव्हाट्यावर आणलाय.
Mar 5, 2015, 05:14 PM ISTयोगेंद्र यादव यांची उचलबांगडी, केजरीवालांचा राजीनामा फेटाळला
आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेला राजीनामा पक्षाने फेटाळून लावला आहे.
Mar 4, 2015, 08:44 PM ISTअरविंद केजरीवाल यांचा 'आप'च्या संयोजक पदाचा राजीनामा
आम आदमी पक्षामध्ये उलथापालथ सुरू आहे. पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या संयोजकपदाचा राजीनामा दिलाय. केजरीवाल यांनी नॅशनल एक्झिक्युटिव्हना पत्र लिहलंय. राजीनाम्यावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा होईल.
Mar 4, 2015, 01:22 PM ISTकेजरीवाल हे लोकपालपेक्षाही मोठे झालेत का? 'आप'मध्ये तू तू मैं मैं
आम आदमी पार्टीत सध्या जोरदार साठमारी सुरू झालीय. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर अनेक वरिष्ठ नेते नाराज असून, आपमध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्यात.
Mar 2, 2015, 07:34 PM IST‘या लोकपाल बिलानं साधा उंदिरही पकडता येणार नाही’- केजरीवाल
सरकारी लोकपाल बिल अण्णांनी संमत केलं असलं, तरी आम आदमी पार्टीनं या बिलाला आपला विरोध दर्शवलाय.
Dec 15, 2013, 08:41 PM ISTपेच दिल्लीच्या गादीचा: प्रशांत भूषण यांनी वक्तव्य फिरवलं
जनलोकपालच्या मुद्द्यावर भाजपने पाठींबा दिला तर दिल्लीत सरकार स्थापनेसाठी आम आदमी पार्टी भाजपला पाठींबा देईल, या प्रशांत भूषण यांच्या विधानावर खळबळ माजली होती. मात्र या प्रशांत भूषण यांनी आज हे विधान फेटाळलंय.
Dec 10, 2013, 12:50 PM IST‘आप’ भाजपला काही अटींसह समर्थन देण्यास तयार- प्रशांत भूषण
दिल्लीत सत्ता कोण स्थापन करणार याला जणू ग्रहणच लागलंय. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीय, सरकार बनवण्यासाठी ३६ सीट्स गरजेच्या आहेत. अजूनही भाजप आणि आम आदमी पक्षानं आतापर्यंत सरकार बनविण्यासंदर्भात पुढं आले नाहीत.
Dec 10, 2013, 10:30 AM ISTसोनियांच्या जावयाने केले फेसबुक अकाऊंट बंद
रिअलिटी क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या डीएलएलची कृपादृष्टी झाल्याच्या आरोपांवरून वादात अडकलेले काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांनी आपले फेसबुक अकाउंट बंद केले आहे. फेसबुकवर त्यांनी भारताची तुलना बनाना रिपब्लिकशी केली होती.
Oct 8, 2012, 05:56 PM ISTटीम अण्णा पुन्हा आक्रमक, पंतप्रधानांवरही आरोप
टीम अण्णांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत युपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. केंद्रातले १५ मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांची त्वरित चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी एका पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.
May 26, 2012, 03:15 PM ISTराळेगणसिध्दीत आज आंदोलनाची दिशा
टीम अण्णामधील सदस्य अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटणार आहेत. यावेळी पुढील आंदोलनाची काय दिशा असावी याबाबत राळेगणसिध्दीत चर्चा होणार असल्याची माहिती टीम अण्णामधील दत्ता तिवारी यांनी दिली.
Jan 10, 2012, 10:41 AM IST