petrol price

डिझेल 1 रुपयानं स्वस्त होणार, तर पेट्रोल दरात 1.75ची कपात

डिझेलचे दर 1 रुपया प्रति लीटरनं कमी होऊ शकतात आणि पाच वर्षांनी पहिल्यांदाच डिझेलचे दर कमी होणार आहेत. तर पेट्रोलचे दर सुद्धा 1.75 रुपये प्रति लीटरची कपात होऊ शकते. आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होऊ शकतात. 

Sep 30, 2014, 04:40 PM IST

पेट्रोलचे दर ७० पैशांनी घटले!

पेट्रोलच्या दरांत प्रती लीटर ७० पैशांनी कपात करण्यात आलीय. सरकारी तेल विपणन कंपनी `इंडियन ऑईल कॉर्प (आयओसी)`नं मंगळवारी या कपातीची घोषणा केली.

Apr 16, 2014, 11:23 AM IST

पेट्रोल स्वस्त तर डिझेल थोडे महाग

सर्वसामान्य जनतेस थोडा दिलासा देणारा निर्णय केंद्रीय मंत्रीमडंळाने घेतला आहे. पेट्रोलच्या भावात कपात करतांना डिझेलच्या रेटमध्ये थोडी वाढ केली आहे.

Sep 30, 2013, 08:12 PM IST

पेट्रोलचा पुन्हा भडका, १.६३ रुपयांनी महाग

पेट्रोलच्या किमती आज मध्यरात्रीपासून प्रति लिटर १.६३ रुपयांनी वाढणार असल्याचे तेल कंपन्यांनी जाहीर केले आहे. गेल्या जून महिन्यापासून ही सातवी दरवाढ आहे.

Sep 13, 2013, 09:31 PM IST

पेट्रोल-डिझेलमध्ये दोन महिन्यांत पाचवी दरवाढ...

तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलीय. गुरुवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आलीय.

Aug 1, 2013, 09:36 AM IST

पेट्रोल तीन रूपयांनी स्वस्त

सातत्याने पेट्रोलच्या किमतीत घट होत असल्याने सर्वसामान्यांना खूशखबर मिळाली आहे. पेट्रोल तीन रूपयांनी स्वस्त झाले आहे.

Apr 30, 2013, 08:15 PM IST

गुड न्यूज... पेट्रोल २ रुपयांनी स्वस्त

देशातील तेल वितरक कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत २ रुपयांनी घट करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून या ही दरकपात लागू होणार आहे.

Mar 15, 2013, 07:40 PM IST

पेट्रोल होणार स्वस्त!

पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता आहे. प्रतिलिटर 1 रुपया 60 पैशांनी पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता असून, येत्या महिन्याभरात हा निर्णय होण्याची शक्यता आहे..

Oct 3, 2012, 08:17 PM IST

पेट्रोल दोन रूपयांनी स्वस्त?

महागाईच्या खाईत लोटलेल्या जनतेला थोडासा दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोलचे दर दोन रूपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.

Sep 28, 2012, 03:33 PM IST

पेट्रोल दराबाबत ३०जूनच्या बैठकीत निर्णय

महागाईचा आगडोंब पेटलेला असताना सामान्यांना थोडासा दिलासा मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. १जुलैपासून पेट्रोलचे दर चार रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. ३० जूनला पेट्रोलच्या दराबाबत तेल कंपन्यांची आढावा बैठक होणार असून त्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे.

Jun 27, 2012, 11:57 AM IST

पेट्रोलच्या दरात घट होण्याची शक्यता

महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला थोडासा दिलासा मिळेल अशी एक बातमी आहे. आज नवी दिल्लीमध्ये तेल कंपन्यांनी एक बैठक आयोजित केलीय. या बैठकीत पेट्रोलच्या किंमतीत २ रुपयांपर्यंत घट करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचच लक्ष लागून आहे.

Jun 15, 2012, 09:08 AM IST

पेट्रोल पाच रूपयांनी महागण्याची शक्यता

निवडणुका संपताच आता महागाईचे चटके बसण्याची चिन्हं आहेत. पेट्रोलमध्ये पाच रुपये वाढ करण्याची मागणी पेट्रोल कंपन्यांनी केली आहे. पेट्रोलमध्ये दरवाढ केली जावी यासाठी सातत्याने पेट्रोल कंपन्या मागण्या करीत आहेत.

Mar 6, 2012, 07:25 PM IST

नव्या वर्षाची भेट, पेट्रोल वाढ २ रूपयाने थेट?

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आम आदमीला पुन्हा महागाईचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोलचे दर सव्वा दोन रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. सध्या रुपयाच्या होणाऱ्या घसरणीमुळे पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीचा बोजा पडणार आहे. देशातल्या इंधन कंपन्यांची यासंदर्भात आज बैठक होण्याची शक्यता आहे.

Jan 2, 2012, 08:52 AM IST

वाढता वाढता वाढे पेट्रोलचे दर ?

पेट्रोलच्या किंमती हा गेल्या काही दिवसापासून चिंतेचा विषय बनत चाललं आहे. पेट्रोलचे दर आता पुन्हा एकदा वाढणार आहे, पेट्रोलचे दर जवळजवळ १ रूपयाने वाढणार असल्याने आता या पेट्रोलच्या दराचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे.

Dec 25, 2011, 03:05 PM IST

पेट्रोलचा भडका पुन्हा.. पुन्हा

डॉलरचा तुलनेत रूपयांची किंमत घसरल्याने आता पुन्हा आणखी एकदा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर येत्या शुक्रवार पासून ०.६५ पैशानी वाढणार आहे. ही दरवाढ शुक्रवारपासून लागू करण्यात येणार आहे.

Dec 14, 2011, 11:33 AM IST