nitesh rane

'माफी मागितली नसती तर दसरा मेळावा मातोश्रीच्या अंगणात'

'माफी मागितली नसती तर दसरा मेळावा मातोश्रीच्या अंगणात'

Oct 8, 2016, 09:37 PM IST

'तर मातोश्रीच्या अंगणात दसरा मेळावा झाला असता'

सामनातील व्यंगचित्राबाबत माफ़ी मागितली नसती तर 'मातोश्री' च्या अंगणात दसरा मेळावा घ्यावा लागला असता अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली आहे.

Oct 8, 2016, 08:26 PM IST

पुणेमार्गे कोकणात जाणाऱया वाहनांना विनाटोल सोडले

स्वाभिमान संघटना आक्रमक पवित्रा घेत कोकणात जाणाऱया वाहनांना खालापूर टोलनाक्यावरून विनाटोल सोडण्याचे आंदोलन सुरू केले. 

Aug 26, 2016, 11:14 PM IST

...तर गाडीवर कोकण असे लिहा

गणेशोत्सवासाठी मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गऐवजी पर्यायी मुंबई-पनवेल-पुणे-सातारा-कोल्हापूर या मार्गाने आपल्या गावी जाणार्या गणेश भक्तांना जाता येता टोल माफी मिळावी अशी मागणी नितेश राणे यांनी केलीय. 

Aug 22, 2016, 08:08 PM IST

मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास, सरकार जबाबदार - नितेश राणे

 मराठा समाजाच्या मागण्यांसाठी, त्यांच्या भवितव्याबाबतचे प्रश्न आणि समस्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार होतो. ३ ऑगस्टला जेजे हॉस्पीटल ते सीएसटीपर्यंत आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या मोर्चाला राज्य सरकारने परवानगी नाकारली. काही दिवसांपूर्वीच याच भागात अनेक मोर्चे निघाले होते. त्यांच्यासाठी वेगळे कायदे आणि आमच्यासाठी वेगळे कायदे का? मराठ्यांनी फक्त सहनच करत रहायचे का? मराठ्यांचा खरा इतिहास वाचला तर मराठे काय करू शकतात, हे तुम्हाला कळेल. आम्हाला मुघल थांबवू शकले नाहीत तर राज्य सरकारची काय बिशाद. जर मराठ्यांचा उद्रेक झाला तर त्यास संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल, असा गर्भित इशारा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

Aug 1, 2016, 10:00 PM IST

पेंग्विन हा शिवसेनेचा बालहट्ट - नितेश राणे

 शिवसेनेचे वय पन्नास वर्षे झाले असले तरी त्यांची वर्तणूक मात्र पाच वर्षांच्या लहान मुलासारखी आहे. नाइटलाइफ आणि ओपन जिमपाठोपाठ आता बालहट्टाचा तिसरा एपिसोड म्हणजे पेंग्विन अशी बोचरी टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर आणि अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

Jul 27, 2016, 07:56 PM IST

राज्य पोलिसांची संघटनेबाबत नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या पोलिसांना मात्र आपलेच प्रश्न मांडण्यासाठी शासनदरबारी फेऱ्या माराव्या लागतात. दररोज पडणारा कामाचा ताण, कुटुंबीयांना देण्यात येणारा वेळ, ड्युट्यांचा प्रश्न, घरासंदर्भातील गहन प्रश्न, पदोन्नती तसेच बदल्या यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि राहणीमानावर होत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यातील पोलिसांची संघटना निर्माण करण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. पावसाळी अधिवेशनानिमित्त नितेश राणे यांनी सोमवारी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र सुपूर्द केले.

Jul 25, 2016, 10:29 PM IST

नितेश राणेंचा सुप्रिया यादव यांच्याविरोधात हक्कभंग

पोलीस विभागाने ३२० विशेष व्यक्तींना पोलीस संरक्षण पुरवल्याची माहिती मिळवण्याबाबत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा केला होता. तीन वेळा अर्ज करूनही पोलीस उपायुक्त (सुरक्षा) सुप्रिया यादव यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. 

Jul 25, 2016, 09:15 PM IST

कुख्यात गुंडाबरोबर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे संबंध : राणे

इंदौरमधला कुख्यात गुंडाबरोबर जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे संबंध असल्याचा गंभीर आरोप, काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे. 

Jul 22, 2016, 08:56 AM IST

'मातोश्रीवर जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोपर्डीला जायला वेळ नाही'

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीतल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळात उमटले.

Jul 18, 2016, 07:34 PM IST

'राणेंनी कुटुंबियांची पोकळी भरावी, अन् त्याचं फोटो प्रदर्शन भरवावं'

काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी चांगलंच फटकारलंय. 

Jul 13, 2016, 02:36 PM IST

मुंबईला खड्ड्यात घालणाऱयांना आता खड्ड्यात पुरण्याची वेळ आली आहे - नीतेश राणे

आता मुंबईकरांच्या डोक्यावरून पाणी गेले आहे. गेली 25 वर्षे मुंबईकरांना खड्ड्यात घालणाऱया सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱयांना पालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवून  खड्ड्यात पुरण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला. निमित्त होते ’मुंबईत खड्डे की खड्ड्यांची मुंबई’ या आगळ्यावेगळ्या चित्रप्रदर्शनाचे.

Jul 12, 2016, 09:10 PM IST