marathi news

डोंबिवलीत आठ मजली इमारतीला भीषण आग; संपूर्ण इमारतीने घेतला पेट

Dombivali Fire : डोंबिवलीत एका आठ मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. काही वेळातच संपूर्ण इमारतीने पेट घेतला असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Jan 13, 2024, 02:24 PM IST

अजब! खड्ड्याने वाचवला जीव, रुग्णवाहिका खड्ड्यातून जाताच मृत व्यक्ती झाली जिवंत

रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अनेकदा जीवघेण्या अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र हरियाणाच्या कर्नालमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका वृद्ध व्यक्तीचा जीव वाचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jan 13, 2024, 01:08 PM IST

मुलींना रस्ता विचारला म्हणून साधूंना बेदम मारहाण; पश्चिम बंगालमध्ये 12 जणांना अटक

Sadhus Assaulted in West Bengal : पश्चिम बंगालमधील गंगासागर मेळ्याला जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील तीन साधूंना गुरुवारी जमावाने मारहाण केल्यानंतर 12 जणांना अटक करण्यात आली. बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात साधू अपहरणकर्ते असल्याचा स्थानिकांना संशय आल्याने स्थानिकांनी त्यांना बेदम मारहाण केली.

Jan 13, 2024, 12:15 PM IST

शरद मोहोळ प्रकरणातील बड्या आरोपींना अटक; तिघांची होती महत्त्वाची भूमिका

Sharad Mohol Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांचाही या हत्येमध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याचे म्हटलं जात आहे.

Jan 13, 2024, 11:14 AM IST

'घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं'; उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका

Uddhav Thackeray : अटल सेतूचं उद्घाटन केलं पण त्यामध्ये अटलजींचा फोटो कुठे होता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शिवडी नाव्हा शेवा या देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचे उद्घाटन केलं होतं.

Jan 13, 2024, 10:39 AM IST

'इट्स लव्ह, नॉट लस्ट...', अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोर्टानं मंजूर केला जामीन

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर केला. आरोपी आणि अल्पवयीन मुलगी यांच्यातील कथित लैंगिक संबंध हे वासनेचे नसून प्रेमसंबंधातून होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Jan 13, 2024, 09:38 AM IST

मुंबईकरांनो सावधान! रस्त्यावर घाण कराल तर क्लीनअप मार्शल करणार अशी कारवाई

Mumbai Cleanup Marshals : कचरा टाकून, ठिकठिकाणी थूंकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा मुंबईत क्लीन अप मार्शल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 10 दिवसांत त्याची अंमलबजावणी होणार आहे.

Jan 13, 2024, 08:49 AM IST

पंतप्रधान मोदी अष्टांग योगातील 'यम' नियमांचं करणार पालन, काय आहे यम नियम? जाणून घ्या

PM Modi 11 Day Anushthan : अयोध्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा 22 जानेवारीला होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष अनुष्ठान करायच ठरवलं आहे. या अनुष्ठानमध्ये मोदी अष्टांग योगातील यम नियमांचं पालन करणार आहेत. 

 

Jan 12, 2024, 04:12 PM IST

‘तुमचे वडील जिवंत असल्याचा पुरावा द्या!’ अत्यवस्थ वृद्धाची पेन्शन थांबवली, रुग्णवाहिकेतून बँकेत बोलावलं

Sangli News : सांगलीत अंथरुणावर खिळलेल्या रुग्णाला नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून सरकारी कार्यालयात आणलं होतं. बॅंकेंच्या कर्मचाऱ्यांनी नियमाच्या नावाखाली रुग्णाला सरकारी कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आता नातेवाईकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

Jan 12, 2024, 03:51 PM IST

याला म्हणतात श्रीमंती! हेलिकॉप्टरमधून मैदानात उतरला डेव्हिड वॉर्नर; 'हे' होतं कारण

David Warner : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर हेलिकॉप्टरने थेट मैदानावर उतरला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. वॉर्नर थेट मैदानावर उतरल्याने अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Jan 12, 2024, 02:24 PM IST

घरी जाण्यासाठी लिफ्ट मागणं बेतलं जीवावर; आलिशान कारच्या धडकेत शेतकरी तरुणाचा मृत्यू

Latur Accident : लातूरमध्ये भरधाव कारने धडक दिल्याने शेतकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Jan 12, 2024, 01:36 PM IST

हाणामारीत तरुणांनी फोडलं महिला डॉक्टरचं डोकं; सुप्रिया सुळेंनी थेट गृहमंत्र्यांचा केला उल्लेख

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात एका महिला डॉक्टरचं डोकं फुटलं आहे. सुप्रिया सुळेंनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Jan 12, 2024, 12:11 PM IST

नागपुरात रिमोटचा वापर करुन उद्योजकांनी चोरली वीज; सात जणांवर गुन्हा दाखल

Nagpur News Today: नागपुरात उद्योजकांनीच वीजचोरी केल्याचे उघड झालं आहे. सात औद्योगिक ग्राहकांनी वीजचोरी केल्याचे भरारी पथकाच्या कारवाईत समोर आलं आहे.

Jan 12, 2024, 11:23 AM IST

अखंड भारताचं श्रेय जिजाऊंचं! PM मोदींनी गौरवोत्गार काढत मांडली मन की बात

Rajmata Jijau Jayanti 2024 : राजमाता जिजाऊंच्या 426 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा युगपुरुष घडवणाऱ्या मातोश्री राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं आहे. सोशल मीडियावर ऑडिओ मेसेज जारी करुन आदरांजली वाहिली आहे.

Jan 12, 2024, 10:40 AM IST

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी मोदी करणार 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी; स्वत: केली घोषणा

Ayodhya Ram Mandir News : 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची भव्यदिव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा (ram mandir consecration ceremony) होणार आहे. त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांचा विशेष विधी सुरु केला आहे.

Jan 12, 2024, 09:54 AM IST