maharashtra

Monsoon Update : पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा

Monsoon Update :गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

Jun 25, 2023, 08:15 AM IST

पावसाळ्यातली भटकंती! अवघ्या 500 रुपयात मुंबई पुण्याजवळच्या 'या' ट्रेकिंग स्पॉट्सला भेट द्याच

Monsoon Trekking : पावसाळा आाल की पर्यटनाची (Tourism) वेगळीच मजा असते. त्यातही ट्रेकिंग (Trekking) म्हणजे अविस्मरणीय आनंदच. मुंबईसह (Mumabi) राज्यात पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. अशात तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर मुंबई-पुण्यापासून जवळच काही गड-किल्ले (Fort) आहेत, ज्यात तुम्ही साहसी ट्रेकिंगची मजा लुटू शकता.

Jun 24, 2023, 07:44 PM IST

आरोग्याशी खेळ! तुमच्या किचनमधील भाजीपाला सार्वजनिक शौचालयातला? किळसवाणा Video

दैनंदिन आहारात वापरला जाणारा भाजीपाला सार्वजनिक शौचालयात ठेवला जात असल्याचा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ बीडमधला असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचं समोर आलं आहे. 

Jun 24, 2023, 04:10 PM IST

Mumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, 'हाय टाईड'चा इशारा

Rain in Mumbai : पावसाची अखेर प्रतिक्षा संपली. पुढच्या दोन - तीन दिवसात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. (Monsoon Update) तर 29 जूनपर्यंत मान्सून राज्यात व्यापणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली बोरिवली, दहिसर परिसरात पाऊस पडलाय...तर कांजूर, भांडूप, विक्रोळी परिसरामध्ये सकाळपासून पाऊस बरसतोय. दरम्यान, समुद्रात तीन ते चार मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jun 24, 2023, 10:21 AM IST

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद, पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा

नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी, आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे. 

Jun 23, 2023, 08:48 PM IST