jammu and kashmir

श्रीनगरमधील अतिरेकी हल्ल्यात ५ पोलीस जखमी

श्रीनगर शहरातील सौरामधील अहमदनगर भागत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच पोलीस जखमी झाले आहेत. या भागात अतिरेकी घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या भागाल घेरले. याचवेळी अतिरेक्यांनी बॉम्बहल्ला केला.

Oct 3, 2013, 09:11 AM IST

पाक सैन्याचा एलओसीवर पुन्हा गोळीबार

जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातल्या मेंढर सेक्ट र इथं पाकिस्तान सैन्यानं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केलाय. मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास पाकनं गोळीबार सुरू केला. तासभर हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात भारताची हानी झालेली नाही, असं संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यानं स्पट केलंय.

Oct 2, 2013, 01:13 PM IST

श्रीनगरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला, एक जखमी

श्रीनगरच्या संतनगरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. हा हल्ला लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आला आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. संपूर्ण परिसराला सैन्याने घातला वेढा असून अतिरेकी लपल्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे.

Sep 28, 2013, 03:03 PM IST

शोहेदा ब्रिगेडनं स्वीकारली जम्मू हल्ल्याची जबाबदारी

जम्मूमध्ये झालेल्या या हल्ल्यांची जबाबदारी एका फारशा माहित नसलेल्या दहशतवादी गटाने घेतलीय. या गटाचं नाव ‘शोहेदा ब्रिगेड’ असं आहे.

Sep 26, 2013, 01:44 PM IST

जम्मूत पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला, ७ जवान शहीद

जम्मूत दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केलाय. इथल्या कटुआ परिसरात दहशतवाद्यांनी हिरानगर पोलीस स्टेशनवर हल्ला केलाय. या हल्ल्यात ७ जवान शहीद झालेत तर तीन जण जखमी झालेत.

Sep 26, 2013, 08:56 AM IST

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्यावर अण्णा हजारे नाराज

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे नाराज झालेत. रविवारी हरियाणातल्या रेवारीमध्ये झालेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात सिंह नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर बसल्यानं अण्णा नाराज झालेत. त्यामुळं त्यांच्याशी संबंध तोडल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.

Sep 21, 2013, 08:25 AM IST

विरोध धुडकावत काश्मीरमध्ये निनादले संगीताचे सूर!

हुरीयतच्या धमकीला भीक न घालता भारतीय वंशाचे जगप्रसिद्ध संगीतकार जुबिन मेहता आज (शनिवारी) काश्मीर खोऱ्यात आपल्या संगीताच्या माध्यमातून शांतीचं आवाहन करणार आहेत.

Sep 7, 2013, 03:46 PM IST

काश्मिरी भारतीय नाहीत का? - ओमर अब्दुल्ला

काश्मिरी नागरिकांकडे ते जणू भारतीय नाहीतच याच नजरेने पाहिले जाते. त्यांना देशाच्या नागरिकांपेक्षा वेगळीच वागणूक दिली जात आहे, असा अजब दावा करत जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरवर अन्याय होत असल्याचा आरोपच केला.

Aug 16, 2013, 09:47 AM IST

किश्तवाड हिंसाचार : आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या -SC

किश्तवाड हिंसाचार प्रकरणी आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवांना दिलेत. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी काय पावलं उचलली याची विचारणा कोर्टानं केलीये. जे ऍण्ड के पॅन्थर्स पार्टीचे प्रमुख भीम सिंग यांनी केलेल्या याचिकेवर कोर्टानं हे आदेश दिलेत.

Aug 13, 2013, 01:09 PM IST

पाचच्या बदल्यात पाकचे ५० मारा – शिवसेना

पाकिस्तानची नांगी मोडण्यासाठी त्यांचे ५० जवान ठार केले पाहिजेत, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. पाकिस्तानची मस्ती काही उतरलेली नाही. पाकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. त्यांच्या हल्ल्यात ५ भारतीय जवानांना शहीत व्हावे लागले. यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

Aug 6, 2013, 02:04 PM IST

भारतीय लष्कर चौकीवर पाककडून गोळीबार

जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे लष्कराच्या छावणीवर गोळीबार पाकिस्तानने गोळीबार केला. पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लघंन करण्यात आलेय.

Jul 27, 2013, 02:58 PM IST

जम्मू - काश्मीरला जोडणाऱ्या रेल्वेमार्गाची वैशिष्ट्यं...

काश्मीरचं स्वप्न आज पूर्ण होतंय. काश्मीर खोऱ्यात कोणत्याही अडथळ्याविना आता प्रवास करता येणं शक्य होणार आहे.

Jun 26, 2013, 11:20 AM IST

दहशतवादी हल्ल्यानंतरही पंतप्रधान-सोनिया काश्मीर दौऱ्यावर

पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीनगरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले होते.

Jun 25, 2013, 10:31 AM IST

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद

श्रीनगरच्या हैदरपुरा भागात लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची वृत्त आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात चार जवान शहीद तर सात जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हिजबुल मुज्जाहिद्दीन यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Jun 24, 2013, 06:04 PM IST

`ये जवानी है दिवानी`वर काश्मिरचे मुख्यमंत्री संतापले!

जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला `ये जवानी है दिवानी` सिनेमावर नाराज झाले आहेत. ट्विटरवर त्यांनी या सिनेमाला चांगलंच धारेवर धरलं आहे.

Jun 2, 2013, 04:52 PM IST