jammu and kashmir

जम्मू-काश्मीरचा सरताज कुणाच्या शिरावर?

जम्मू-काश्मीरचा सरताज कुणाच्या शिरावर विराजमान होणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे. कारण पीडीपी ३० जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलाय. तर भाजपनं कधी नव्हे ते २५ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारलीय. मात्र त्रिशंकू विधानसभेमुळं कुणाचं सरकार बनणार, हे कोडं अजून सुटलेलं नाही.

Dec 23, 2014, 07:53 PM IST

जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान

जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये पाचव्या आणि अंतिम टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालीय.

Dec 20, 2014, 09:50 AM IST

नवज्योतसिंग सिद्धू यांच्या ताफ्यावर दगडफेक

जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आज  जम्मू येथे सभा घेण्यासाठी आलेले भाजप नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. यामध्ये सिद्धू यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

Dec 18, 2014, 08:42 PM IST

झारखंड, काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरूवात

झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास रविवारी सकाळी सुरूवात झाली. जम्मू-काश्मीरमध्ये १८ जागांसाठी मतदान होत असून १८२ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होईल. १८९० मतदान केंद्रावर १४ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

Dec 14, 2014, 11:07 AM IST

जेलमधून पाच दहशतवादी पसार, देशभरात हायअलर्ट

मध्य प्रदेशतल्या जेलमधून पाच दहशतवादी पसार झाले आहेत. आयएसआयच्या सांगण्यावरून हे दहशतवादी देशात कुठंही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळं गुप्तचर संस्थेनं देशभरात हाय अलर्ट जारी केलाय.

Dec 8, 2014, 07:59 PM IST

श्रीनगरमध्ये अतिरेक्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात ८ जखमी

जम्मूतील अरनिया सेक्टरमध्ये हल्ल्याला दोन दिवस झाले नाही तो शनिवारी दुपारीश्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात संशयीत अतिरेक्यांनी ग्रेनेड हला केला.या हल्ल्यात ८ लोक जखमी झालेत.

Nov 29, 2014, 05:56 PM IST

जम्मू-काश्‍मिरात ७०, झारखंडमध्ये ६१.९२ टक्के मतदान

जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील १५ जागांसाठी ७० टक्के मतदान तर झारखंडमध्ये ६१.९२ टक्के झाल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उमेश सिन्हा यांनी दिली.  

Nov 25, 2014, 07:05 PM IST

काश्मीर, झारखंडमध्ये मतदानाला सुरुवात

जम्मू काश्मीर आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. काश्मीरमधील १५ आणि झारखंडमधील १३ मतदारसंघात हे मतदान होत आहे.

Nov 25, 2014, 11:49 AM IST

पाकिस्तानचा पुन्हा पूँछमध्ये गोळीबार

पाकिस्तानच्या कारवाया अद्याप सुरूच असून शुक्रवारी रात्री पाकिस्ताननं पुन्हा पूँछ जिल्ह्यात गोळीबार केला. पूँछ जिल्ह्यातील हमीरपूर सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर पाकिस्तानच्या जवानांनी गोळीबार केला. 

Oct 18, 2014, 12:27 PM IST

शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानला महागात पडेल- संरक्षणमंत्री

 सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. भारतानं पाकिस्तानच्या या कारवायांची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तान कडून असेच हल्ले होत राहिल्यास त्याची गंभीर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा इशारा संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिलाय.

Oct 9, 2014, 12:35 PM IST

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश, गोळीबार सुरूच

जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाल्यानंतर भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरहद्दीवरील तणाव कमालीचा वाढला. 

Oct 9, 2014, 08:55 AM IST

UPDATE: पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी गृहमंत्रालयाची तातडीची बैठक

सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या कुरापाती सुरुच असून बुधवारी पहाटे पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात सांबा सेक्टरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ११ भारतीय नागरिक या हल्ल्यात जखमी झाले आहेत.  

Oct 8, 2014, 12:02 PM IST

बचाव कार्यात अडथळे, फुटीरवाद्यांचा प्रयत्न काश्मिरी जनतेनेच हाणून पाडावा

१५ सप्टेंबरला फुटीरतावादी नेता यासिन मलिकने मदत कार्याची नौकाच पळवून नेली आहे. १६ सप्टेंबरला जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्हयात एलओसीजवळ दोन बॉम्बस्फोट झाले . यात बीएसएफच्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले आहे.

Sep 18, 2014, 07:36 PM IST