जम्मू-कश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू-कश्मीरमधील हंदवाडामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत आतापर्यंत जवानांनी लश्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे.
Feb 14, 2017, 07:58 PM ISTजवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, २ जवान शहीद
जम्मू काश्मीरच्या कुलगाममधील यारीपोरा भागात २ भारतीय जवान शहीद तर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. या ठिकाणी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून चकमक सुरु आहे. या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.
Feb 12, 2017, 01:44 PM ISTजम्मू काश्मीरमधल्या अखनूरमध्ये दहशतवादी हल्ला
जीआरईफ कँपवर सोमवारी सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन कामगारांना मृत्यू झाला आहे. अखनूरजवळील बटल येथे हा दहशतवादी हल्ला झाला. अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. यानंतर दहशतवादी फरार झाले.
Jan 9, 2017, 02:43 PM ISTदहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार
जम्मू-कश्मीरमधील बारामूला जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळी दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशदवादी ठार झाला आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरु असल्याचं बोललं जातंय.
Jan 3, 2017, 09:26 AM ISTअतिरेक्याच्या नातलगांना नुकसानभरपाई देण्याचा या सरकारचा निर्णय
जम्मू-काश्मीर सरकारने एका कथित अतिरेक्याच्या नातलगांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 13, 2016, 05:26 PM ISTजम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री
जम्मू काश्मीरच्या अरवानी आणि अनंतनाग परिसरात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. दोन दहशतवादी लपल्याची माहिती आहे.
Dec 8, 2016, 03:55 PM ISTदहशतवादी हल्लात महाराष्ट्राचे २ जवान शहीद
जम्मूजवळ नागरोटा येथे लष्कराच्या एका तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे २ जवान शहीद झाले आहेत. नांदेडचे संभाजी कदम तर पंढरपूरचे कर्नल कुणाल गोसावी यांना वीरमरण आलं.
Nov 29, 2016, 05:07 PM ISTजम्मू-काश्मीरमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत दोन दहशतवादी ठार झालेत तर भारताचा एक जवान शहीद झालाय. अद्यापही या भागात चकमक सुरु आहे.
Nov 25, 2016, 09:34 AM ISTपाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा जवान शहीद
भारत देश उत्साहात दिवाळी साजरी करत असतानाच, सीमेपलिकडून पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला.
Oct 28, 2016, 08:56 AM ISTबारामुल्ला जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सात रेंजर्सना ठार केल्यानंतरही पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.
Oct 22, 2016, 05:43 PM ISTसंचारबंदी उठल्यानंतरही हुर्रियतचा बंद सुरूच
संचारबंदी उठल्यानंतरही हुर्रियतचा बंद सुरूच
Oct 4, 2016, 05:08 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये करणार 10 हजार स्पेशल पोलिसांची भर्ती
जम्मू-कश्मीरमध्ये 10 हजार विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यात वाढत चाललेली अशांती आणि हिंसा नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने राज्य सरकारला याबाबत मान्यता देखील पाठवली आहे.
Sep 21, 2016, 08:13 PM ISTतोडीस तोड उत्तर दिलं पाहिजे- संरक्षण तज्ज्ञ एस. आर. सिन्हो
जम्मू काश्मीरच्या उरी इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे 5.30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. लष्कराच्या 12 व्या ब्रिगेडच्या मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 17 जवानांना वीरमरण आलं.. तर 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद असल्याचं डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सनी म्हटलंय.
Sep 18, 2016, 08:46 PM ISTपाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली - सुभाष भामरे
जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृतच आहे. आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे, असे मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केलं आहे.
Sep 18, 2016, 07:30 PM ISTजम्मू-काश्मिरातील पुंछ जिल्ह्यात दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले
पुंछ जिल्ह्यात दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले झालेत. या हल्ल्यांत तीन दहशतवादी ठार झालेत तर एक पोलीस शिपाई शहीद झालाय.
Sep 11, 2016, 03:34 PM IST