jammu and kashmir

पाकिस्तानने पुन्हा एकदा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानने पुन्हा एकदा नापाक हरकत करत जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत गोळीबार केला आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या या आगळीकीला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले.

Sep 13, 2017, 10:20 PM IST

लाल चौकात तिरंगा फडकवायला गेलेल्या भाजपच्या २०० युवा कार्यकर्त्यांना अटक !

लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी 'तिरंगा यात्रे' साठी निघालेले भाजप युवा संघटनेचे सुमारे २०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेल्या विभिन्न कार्यकर्त्यांना विविध पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. 

Aug 15, 2017, 03:54 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना केलं ठार, २ जवान शहीद

जम्मू-कश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षारक्षकांचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. या ऑपरेशनमध्ये सुरक्षारक्षकांनी ३ दहशवताद्यांना ठार केलं आहे. या एन्काऊंटरमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात  आलं आहे.

Aug 13, 2017, 01:24 PM IST

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात महिला ठार

पाकिस्तानकडून सीमाभागात पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलेय. पाक गोळीबारात एक ४५ वर्षीय महिला ठार झाली. मेंढर सेक्टर येथे पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.

Aug 12, 2017, 09:39 AM IST

अमरनाथ दहशतवादी हल्ला, देशात सर्वत्र हाय अलर्ट

 दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताच्यावतीने त्यांना चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Jul 11, 2017, 08:31 AM IST

अमरनाथच्या यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला, ७ जणांचा मृत्यू १९ जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू तर १९ जखमी झालेत.

Jul 11, 2017, 08:12 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा भागात दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणलाय. हाजिन भागात झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहे.

Jul 8, 2017, 10:14 AM IST

जम्मू-काश्मीरमध्येही GST, आज रात्री १२ वाजल्यापासून होणार लागू

जम्मू-काश्मीरमध्ये आज रात्री १२ वाजल्यापासून वस्तू आणि सेवा कर (GST) लागू केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जम्मू-काश्मीर विधानसबेत जीएसटी विधेयक लागू होणार असल्याची माहिती गुरुवारी दिली होती. 

Jul 7, 2017, 06:44 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये १ दहशतवादी ठार, आणखी २ दहशतवादी असल्याची माहिती

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधीस चकमकीत आज एक दहशतवादी मारला गेला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचं नाव किफायत सांगितलं जात आहे. तर आणखी दोन दहशतवादी असल्याचं बोललं जातंय.

Jul 3, 2017, 11:51 AM IST

जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलांनी तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे. हे दहशतवादी लश्कर-ए-तोयबाशी संघटनेशी जोडलेले होते. काल रात्रीपासून ही चकमक सुरू होती.

Jun 22, 2017, 01:59 PM IST

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात महिलेचा मृत्यू

पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्ताने गोळीबार केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला.

May 11, 2017, 11:34 AM IST

काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना आता महिला बटालियन शिकवणार धडा

काश्मीर खोऱ्यातल्या या दगडफेकीच्या समस्येवर उपाय म्हणून आता 1 हजार महिलांची बटालियन उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पाच भारतीय राखीव बटालियन तयार करण्याची घोषणा सरकारनं यापूर्वीच केली आहे. त्यामध्ये आता १ बटालियन ही केवळ महिला पोलिसांची असेल.

Apr 27, 2017, 10:56 PM IST

बांदीपोरा भागात दहशतवाद्यांशी चकमक, एक जवान शहीद

सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना असतोष कुमार यांना वीरमर आले आहे. उत्तर काश्मीरमधल्या बांदीपोरा भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत असतोष कुमार शहीद झालेत.

Feb 16, 2017, 09:05 AM IST