indian army

लष्करी श्वानपथकातील श्वानांना सेवानिवृत्तीनंतरही जगता येणार

आतापर्यंत भारतीय लष्करात सेवानिवृत्त झालेल्या श्वानांना इंजेक्शन देऊन मारले जात असेल मात्र आता असे होणार नाही. आता लष्करी पथकातील श्वानही सेवानिवृत्तीनंतर संपूर्ण जीवन जगू शकणार आहेत. या श्वानांनी संपूर्ण जगण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने दिलाय. 

Jan 21, 2016, 02:28 PM IST

१९९९च्या युद्धात भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार होता पाकिस्तान

१९९९च्या कारगिल युद्धात पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करण्याच्या तयारीत होता अशी माहिती व्हाईट हाऊसच्या एका माजी अधिकाऱ्याने दिलीय.

Dec 3, 2015, 02:04 PM IST

भारतासमोर पाकिस्तान तर 'बच्चा है जी'?

भारत आणि पाकिस्तान शेजारी देश... पण भारतीय सैन्य पाकिस्तानच्या सैन्यापेक्षा कित्तेक पटीनं उत्तम असल्याचं स्वीत्झर्लंड क्रेडिट स्वीस संस्थेनं सांगितलं.

Oct 5, 2015, 03:52 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत १ दहशतवादी ठार, ४ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा परिसरात दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळालंय. मात्र चकमकीत ४ जवान शहीद झाले आहेत. कूपवाडा इथल्या लोलबाच्या घनदाट जंगलात काल रात्रीपासून ही धुमश्चक्री सुरू आहे.

Oct 5, 2015, 12:41 PM IST

इंडियन आर्मीत आहे नोकरीची संधी, नोकरीसाठी इथं अर्ज करा

तुम्हांला भारतीय लष्कराचा भाग बनून देशाची सेवा करायची इच्छा आहे, तुम्हांला इंडियन आर्मीत सामील होण्याची संधी आहे. इंडियन आर्मीने टेक्निकल ग्रॅज्युअट कोर्ससाठी अर्ज मागविले आहेत. तुमच्याकडे या नोकरी संबंधी खालील योग्यता आहे. तर २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. 

Sep 20, 2015, 10:53 PM IST

नावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती

नावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती 

Aug 28, 2015, 09:06 AM IST

नावेदनंतर आणखी एक जिवंत दहशतवादी सैन्याच्या हाती

दहशतवादी नावेदनंतर आज बीएसएफ जवानांनी आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडलंय. सैन्य आणि पोलिसांनी उत्तर काश्मीरमधून पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडलं. सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले तर एकाला जिवंत पकडण्यात आलं.

Aug 27, 2015, 06:36 PM IST

दिल्लीत पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की

सारा देश स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्यासाठी सज्ज होतोय. त्याचवेळी दुसरीकडे ज्या सैनिकांनी देशासाठी सारं आयुष्य वेचलं त्याच सैनिकांना बेदखल करण्यात आल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडलाय. पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आलाय.

Aug 14, 2015, 02:48 PM IST

अमेरिका,पाकिस्तानला मागे टाकत इंडियन आर्मीचं फेसबुक पेज टॉपवर

सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय होण्याचा मान भारतीय लष्करानं दुसर्‍यांदा पटकावला आहे. सीआयए, एफबीआय, नासा यासारख्या नामांकित विदेशी सरकारी संस्थांच्या फेसबुक पेजला मागे टाकत भारतीय लष्कराने आपल्या फेसबुक पेजवर तब्बल २९ लाख लाइक्स मिळविले आहेत. 

Aug 10, 2015, 09:33 AM IST

व्हिडिओ: असं घडलं ऑपरेशन 'गर्व', पाकिस्तान-चीनसाठी इशारा

भारत-म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांविरोधात सैन्याचं ऑपरेशन गर्व खूप गुप्तपणे केलं गेलं. भारतीय कमांडोंनी दहशतवाद्यांचे दोन कॅम्प उद्ध्वस्थ करत १५ अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. 

Jun 10, 2015, 04:41 PM IST

म्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान

म्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान

Jun 10, 2015, 03:19 PM IST

म्यानमारमध्ये जाऊन भारतीय जवानांनी घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला

भारतीय सैन्यानं असं काम केलंय ज्यामुळं सर्व भारतीयांचा उर अभिमानानं भरून आलाय. जवानांनी पहिल्यांदा देशाबाहेर जावून मोठी कारवाई केलीय. म्यानमारच्या सैन्यासोबत संयुक्त कारवाई करत दशतवाद्यांना कंठस्नान घातलं आणि मणिपूर हल्ल्याचा बदला घेतला.

Jun 9, 2015, 08:09 PM IST

मणिपूर : दहशतवादी हल्ल्यात १० जवान शहीद

मणिपूरमधल्या चंडेल जिल्ह्यामध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात १० जवान शहीद झालेत. या हल्यामध्ये ८ ते १० जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, जखमी जवानांना नागालँडमध्ये हवाईमार्गे उपाचारांसाठी हलवण्यात आले आहे.

Jun 4, 2015, 03:52 PM IST

कॅप्टन सौरभ कालिया मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार नाही- मोदी सरकार

कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानच्या तावडीत निर्घृण हत्या झालेले कॅप्टन सौरभ कालिया यांचा मृत्यूचा आंतरराष्ट्रीय तपास करण्यास एनडीए सरकारनं नकार दिलाय. सरकारनं संसदेत याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलंय.

Jun 1, 2015, 01:07 PM IST