लोकसभा निवडणूक आठवा टप्पा; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यासाठी आज मतदान होतय. सात राज्यांमधील 64 जागांवर उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
May 7, 2014, 08:04 AM ISTलोकसभा निवडणुकीत प्रिती देणार प्रियाला टक्कर?
बॉलिवूडमध्ये अभिनेत्री प्रिती झिंटाच्या राजकीय प्रवेशावरून जोरदार चर्चा रंगलेली दिसतेय. प्रिती झिंटा अभिनेता संजय दत्तची बहिण प्रिया दत्त हिला लोकसभा निवडणुकीत टक्कर देण्याची शक्यता आहे.
Mar 4, 2014, 04:14 PM ISTनिवडणुकीचा आखाडा, राजकारणाचे रंग
एकमेकांची स्तुती करणारे राजकीय नेते एकमेकांची उणीधुणी काढू लागले. आणि कालपरवापर्यंत एकमेकांवर आगपाखड करणारे, एकाच व्यासपीठावर येऊ लागलेत. निवडणुका जवळ आल्यात, म्हणूनच की काय महाराष्ट्राच्या राजकारणाचे असे रंग बदलू लागलेत.
Feb 23, 2014, 08:30 PM ISTउदयनराजे भोसलेंबाबत शरद पवार म्हणालेत, `तवा`च रिकामा!
सातारा लोकसभा मतदार संघात भाकरी फिरवणार काय, असा प्रश्न शरद पवारांना पत्रकारांनी विचारला, त्यावेळी साता-यात तवाच रिकामा आहे, असं उत्तर पवारांनी दिलंय. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तर मोदी भेटीवर गोपीनाथ मुंडेना जोरदार टोला लगावला.
Feb 1, 2014, 08:58 PM ISTमी मोदींना घाबरलो नाही- राहुल गांधी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की , मी भाजपच्या कोणत्याच नेत्याला भीत नाही. काँग्रेसच्यावतीनं पंतप्रधानपदाचे उमेदवार न होऊन ते मोदींना टक्कर देण्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी हा प्रश्न समजायला तुम्हाला आधी राहुल गांधी कोण आहे हे समजावं लागेल. मग तुम्हाला कळेल मी कोणालाच भीत नाही, असंही ते म्हणाले.
Jan 28, 2014, 11:11 AM IST.. मेहनत करे मुर्गा और अंडा खाए फकीर!
दिल्लीतलं काँग्रेसचं जहाज कुणी बुडवलं असेल तर ते `आम आदमी पार्टी`नं... आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला नसला तरी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित सरकारचा सुपडा साफ करण्यात आपचा `झाडू`च कारणीभूत ठरला... आम आदमीच्या या घवघवीत यशाचा सूत्रधार होता एक आयआयटीचा मॅकेनिकल इंजिनिअर... अरविंद केजरीवाल...
Dec 8, 2013, 10:40 PM ISTमध्य प्रदेशात पुन्हा भाजपला कौल, विजयाची हॅटट्रिक!
मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपने आपला करीष्मा दिसून आलाय. मतदारांनी भाजपलाच कौल दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजयाची हॅटट्रिक भाजप साधणार असेच दिसतेय. १३४ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची बहुमताकडे सध्यातरी वाटचाल दिसून येत आहे.
Dec 8, 2013, 10:52 AM ISTतुरुंगातून निवडणूक लढविण्यास न्यायालयाची मंजुरी
तुरुंगात असलेल्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने एक दिलासा दिला आहे. तुरुंगातून निवडणूक लढविण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. लोकसभेत संमत करण्यात आलेल्या दुरुस्ती विधेयकाला न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
Nov 20, 2013, 07:24 AM ISTकाँग्रेसकडून शिवसेना टार्गेट, मनसेला झुकते माप?
काँग्रेस विरूद्ध नरेंद्र मोदी असे राजकीय रंग भरले असतानाच आता काँग्रेसने शिवसेनेला टार्गेट करण्याचं धोरण अबलंबिले दिसून येत आहे. शिवसेना टार्गेट करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे.
Nov 19, 2013, 01:29 PM ISTठाणे पालिकेत महायुतीचे विलास कांबळे बिनविरोध
ठाणे महापालिका स्थायी समिती निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. महायुतीचे विलास कांबळे बिनविरोध स्थायी समितीवर निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धूळ चारली.
Oct 11, 2013, 01:56 PM ISTठाणे पालिकेत रंगत, राष्ट्रवादीच्या साळवींचा राजीनामा
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश साळवी यांनी राजीनामा दिला. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान भाजपचे संजय वाघुलेही अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या खेळीमुळे आघाडीपुढे पेच निर्माण झाल्याचं मानलं जातंय.
Oct 11, 2013, 09:41 AM ISTमोदींच्या सभेसाठी १० हजार बुरख्यांची खरेदी - दिग्गीराजा
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथील सभेसाठी १० हजार बुरखे खरेदी केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
Sep 24, 2013, 07:47 PM ISTपाकिस्तानात मतदान पूर्ण, हिंसाचारात २४ ठार
दहशतवादी धमक्यांमध्ये आणि कारवायांमध्ये पाकिस्तानात शनिवारी मतदान पार पडलं. मतदान संपन्न झाल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झालीय.
May 11, 2013, 09:28 PM ISTपवारांनी लोकसभा निवडणुकीचे वाजवले बिगुल
लोकसभेत दुसऱ्या पक्षांच्या पाठिंब्यावर सरकराचं भवितव्य अवलंबून आहे. केंद्रातील सरकार कधी पडेल, याचा भरवसा नाही, असे संकेत देताना आगामी काळात निवडणुकीसाठी सज्ज राहा, असा संदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.
Apr 27, 2013, 03:44 PM ISTनारायण राणेंना दे धक्का, काँग्रेसचा उमेदवार बाद
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांना कणकवलीत जोरदार धक्का बसला आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाद ठरले आहेत.
Mar 8, 2013, 07:27 PM IST