election

भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल तर नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला

 जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर भाजप खासदार नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भंडारा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला झटका दिला. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत आता चुरस निर्माण झालीय.

Oct 21, 2016, 10:17 PM IST

तुमसर नगर परिषदेमधील राष्ट्रवादी सत्ता कायम राखणार का?

जिल्ह्यातल्या तुमसर नगर परिषदेत सद्यस्थितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र यावेळी भाजप बाजी मारणार का? याची उत्सुकता आहे.  

Oct 21, 2016, 10:11 PM IST

वर्ध्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चुरस

जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे दोन-दोन नगरपालिका आहे. मात्र यंदा सर्वच ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. 

Oct 21, 2016, 12:07 AM IST

आगामी निवडणुकीत सेना स्वबळावर, उद्धव ठाकरेंचे संकेत

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचा सूर आज मातोश्रीवर झालेल्या शिवेसेनेचे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Oct 20, 2016, 03:13 PM IST

राष्ट्रवादीच्या पूर्व विदर्भ गडात भाजपची सत्ता, पटेल-बडोलेंची प्रतिष्ठा पणाला

 गोंदिया हा राष्ट्रवादीचा गड समजला जात असला तरी सध्या इथं भाजपची सत्ता आहे. प्रफुल्ल पटेल आणि राजकुमार बडोलेंची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागलीय. 

Oct 19, 2016, 06:06 PM IST

तिरोडा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला कोण शह देणार?

जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आपली सत्ता कायम राखणार का, याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच याठिकाणी सर्वेसर्वा असली तरी त्यांना मात देण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. 

Oct 19, 2016, 05:27 PM IST

निवडणूक येताच केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केला रामनामाचा जप

निवडणूक येताच केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केला रामनामाचा जप

Oct 19, 2016, 12:15 AM IST

न.प. निवडणुकीत नागपुरात भाजपला जोरदार फटका बसणार?

शेतीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी नाराज आहेत. त्याचाच फटका भाजपला बसेल असा दावा विरोधकांनी केला आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचं लक्ष भाजपचं असलं तरी वाटतो तेवढा हा प्रवास सोपा नक्कीच नाही. नागपुरातली काटोल नगर परिषद लक्षवेधी ठरणार आहे. काय वैशिष्ट्य आहेत इथली... कोण कुणाला आव्हान देऊ शकतं पाहूयात त्यासंदर्भातला रिपोर्ट. 

Oct 18, 2016, 11:00 PM IST

नागपूर नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री, गडकरी यांची प्रतिष्ठा पणाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच्या या शहरात भाजप वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील असतील तर विरोधक त्यांना रोखण्यासाठी झटतील, अशी स्थिती दिसत आहे.

Oct 18, 2016, 10:52 PM IST

ठाण्यात पक्ष प्रवेशावरुन शिवसेना-मनसेत शह-काटशह

ठाण्यातील काही शिवसैनिकांनी मनसेचा रस्ता धरलाय. दिव्यातील मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं नाराज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कृष्णकुंज गाठून मनसेत प्रवेश केला. 

Oct 18, 2016, 07:04 PM IST

शिवसेनेत राष्ट्रवादी, मनसेच्या नगरसेवकांचा प्रवेश

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आयाराम-गयारामचा सुळसुळाट वाढला आहे. शिवसेनेने अन्य राजकीय पक्षातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. 

Oct 18, 2016, 06:28 PM IST