जनतेचा विश्वासघात करणाऱ्या काँग्रेसला शिक्षा - अण्णा हजारे
दिल्लीत काँग्रेसची जोरदार पिछेहाट झालीय. नवी दिल्लीत गेल्या १५ वर्षांची काँग्रेसची सत्ता संपुष्टात येणार हे स्पष्ट झालंय.
Dec 8, 2013, 12:02 PM ISTकेजरीवालांच्या `झाडू`नं केला दिल्लीत `काँग्रेसचा सफाया`
दिल्ली निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमीने मोठी झेप मारत अनेक वर्षे दिल्लीच्या सत्तेत राहणाऱ्या काँग्रेचा सफाया केलाय. मुख्य म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव अरविंद केजरीवाल करणार हे निश्चित झाले आहे. केजरीवाल यांनी ५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
Dec 8, 2013, 11:24 AM ISTदिल्लीत तिरंगी लढत, जाहीरनाम्यांतून आश्वासनांची खैरात
दिल्लीतला पारंपरिक काँग्रेस विरुद्ध भाजपचा सामना यंदा आम आदमी पार्टीमुळं तिरंगी झालाय. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ मुकाबला होता मात्र आम आदमी पार्टीमुळं दिल्लीत तिरंगी सामना रंगतोय.
Dec 8, 2013, 08:34 AM ISTमहिलांशी बोलतानाही वाटते भीती - फारुक अब्दुल्ला
केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःला चर्चेत आणले आहे. फारुक यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात म्हटले की, आताच्या परिस्थितीत महिलांबरोबर बोलताना ही भीती वाटते. सध्या अशी परिस्थिती आहे की महिलां पीए ठेवण्यास भीती वाटते. यावरच ते न थांबता पुढे म्हणाले की, मी विचार केला आहे. महिला पीए ठेऊन मी स्वतःच जेलमध्ये नको जायला म्हणून महिला पीए ठेवत नाही.
Dec 6, 2013, 02:12 PM ISTएकत्र राहणे म्हणजेच `लिव्ह इन` नव्हे : कोर्ट
लिव्ह इन म्हणजे फक्त एकत्र राहणे नसून त्यात जोडीदारासाठी जबाबदारीची भावनाही गरजेची असल्याचे मत दिल्ली सेशन कोर्टाने व्यक्त केले आहे.
Dec 6, 2013, 08:59 AM ISTएडवर्ड स्नोडेन दिल्लीतच शिकला कॉम्प्युटर हॅकिंग
अमेरिकेच्या ‘प्रिज्म’ या हेरगिरीची प्रकल्पाचा भंडाफोड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेननं कॉम्प्युटर हँकिंगचं तंत्रशुद्ध ज्ञान नवी दिल्लीतच घेतलंय. दिल्लीच्या कोइंग सोल्यूशन या इन्स्टिट्यूटमधून स्नोडेननं हे शिक्षण घेतलंय. या इन्स्टिट्यूटनंच ही माहिती प्रसिद्ध केलीय.
Dec 5, 2013, 11:49 AM ISTदिल्लीत रेकॉर्डब्रेक मतदान... लोकशाहीला शुभशकुन!
मतदानाबाबत निरुत्साही अशी ओळख असलेल्या दिल्लीकरांनी बुधवारी मात्र नवा चमत्कारच केला. भारतीय राजकारणाचं सत्ताकेंद्र असलेल्या दिल्लीत बुधवारी लोकशाहीची सिंहगर्जना झाली.
Dec 5, 2013, 09:30 AM ISTविधानसभा निवडणूक : देशाच्या राजधानीत मतदान सुरू...
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झालीय.
Dec 4, 2013, 09:40 AM ISTनागपूरकर गडकरी फडकवणार दिल्लीत भाजपचा झेंडा?
दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपचे नेते नितीन गडकरींवर देण्यात आलीये. नितीन गडकरी सध्या कसा प्रचार करत आहेत, त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत, त्यांचा दिनक्रम कसा आहे. हे जाणून घेऊया...
Nov 30, 2013, 07:24 PM ISTपृथ्वी`राजकन्ये`चा विवाह, साधेपणाचा ‘आदर्श’!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय नेत्यांपुढं नवा `आदर्श` घालून दिलाय. कसलाही थाटमाट किंवा बडेजाव न मिरवता, अत्यंत साधेपणानं त्यांनी आपली लाडकी कन्या अंकिता आणि दिल्लीतील व्यावसायिक प्रखर भंडारी यांचं लग्न लावून दिलं. त्यांचा हा आदर्श भपकेबाज राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.
Nov 29, 2013, 07:27 PM IST३००० कोटींपेक्षा जास्त काळं धन जप्त!
केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागानं आर्थिक वर्ष २०१३ च्या पहिल्या सहा महिन्यांतच तब्बल ३००० कोटी रुपयांच्या काळ्याधनाचा पर्दाफाश केलाय. गुप्तचर विभागानं वर्षात कर चोरी आणि काळा पैसा बाळगणारे १७४ प्रकरणे उघडकीस केले आहेत. ‘सीबीआय’ या गुन्हेगारांची अधिक चौकशी करत आहे.
Nov 27, 2013, 05:34 PM ISTऊस दराचं गुऱ्हाळही पोहचलं दिल्लीत, उत्तर नाहीच!
ऊस दराच्या मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली.
Nov 26, 2013, 07:51 PM IST‘मोठा भीम’ पेलणार दिल्ली निवडणुकीचा डोंगर...
छोट्या पडद्यावर बहूचर्चित आणि लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत भीमाची भूमिका निभावणारे प्रवीणकुमार आता दिल्ली निवडणुकीचा डोंगर पेलणार आहेत.
Nov 12, 2013, 10:17 AM ISTतिसऱ्या आघाडीच्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित
नवी दिल्लीमध्ये तिसऱ्या आघाडीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. नवी दिल्लीत आज एकाच मंचावर समाजवादी पक्ष, जेडीयू, सीपीआयएम, जेडीएस, सीपीआय यांसह २० पक्ष उपस्थित आहेत. जेडीयूचे शरद यादव, सीपीएमचे प्रकाश करात, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव एकत्र दिसून आले.
Oct 30, 2013, 03:21 PM ISTनिवडणूक सभांचा आज सुपर संडे!
५ राज्यातील निवडणुकांची धामधूम सुरु झालीय. त्याच पार्श्वभूमीवर आज निवडणूक सभांचा सुपर संडे रंगणार आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी सामना पाहायला मिळणार आहे.
Oct 27, 2013, 11:29 AM IST