`आप`ला समर्थन देण्यावरून काँग्रेसमध्ये फूट - द्विवेदी
दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी तयारीत असलेल्या ‘आम आदमी पार्टी’ला काँग्रेसकडून दिल्या गेलेल्या पाठिंब्यावर आता पक्षातच फूट पडताना दिसतेय.
Dec 24, 2013, 06:39 PM ISTअरविंद केजरीवाल नाही... एके-४६!
अरविंद केजरीवाल यांचं दुसरं नाव आहे ‘एके-४६’… होय, लवकरच दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर आरुढ होणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’च्या नेत्याला हे नाव त्यांच्या चाहत्यांनी दिलंय. सोशल वेबसाईटवर एके-४६ या नावाचा सध्या बोलबाला आहे.
Dec 24, 2013, 03:59 PM ISTदिल्लीत केवळ `आप`चेच सरकार असेल - अरविंद केजरीवाल
दिल्लीत संयुक्त सरकार होणार नाही. केवळ आम आदमी पार्टीचेच सरकार असेल. सरकार स्थापन करण्यासाठी कोणताही समझोता होणार नाही. तसेच आप सरकार कायम राहण्यासाठी कोणताही समझोता आम्ही करण्यार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
Dec 24, 2013, 01:29 PM ISTदिल्लीत ‘आप’चीच सत्ता, अरविंद केजरीवाल नवे मुख्यमंत्री
दिल्लीत आता आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करणार असल्याचं ‘आप’नं स्पष्ट केलंय. आज आम आदमी पक्षाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. पत्रकार परिषद घेऊन केजरीवालांनी आपण आज नायब राज्यपालांना भेटायला जाणार असून सत्ता स्थापनेसाठी पत्र देणार आहे.
Dec 23, 2013, 12:09 PM ISTदिल्लीत ‘आप’चं सरकार, आज होणार घोषणा
दिल्लीमध्ये सरकार स्थापनेकडे आम आदमी पार्टी आता कूच करतेय... अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे… आम आदमी पक्षाच्या जनमत चाचणीत दिल्लीकरांनी हा कौल दिलाय.
Dec 23, 2013, 08:28 AM ISTकेजरीवाल नाही तर मनिष सिसोदिया बनणार मुख्यमंत्री?
‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेचे संकेत दिलेत. पण, भारताच्या राजधानीच्या शहरात मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार? याचा अंतिम निर्णय त्यांनी आपल्या आमदारांवर सोडलाय.
Dec 22, 2013, 06:27 PM ISTदिल्लीत ‘आप’ बनवणार सरकार... मुख्यमंत्री कोण?
दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी आम आदमी पार्टीकडून दिल्या गेलेल्या वेळेनुसार आजचा शेवटचा दिवस आहे. पार्टीचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांनी सत्ता स्थापनेसंबंधी सोमवारी निर्णय जाहीर करण्यात येईल, असं म्हटलंय.
Dec 22, 2013, 03:59 PM ISTसरकार चालवणं म्हणजे चंद्रावर जाण्यासारखं नाही- केजरीवाल
तेरा दिवसांपासून सरकारविना असलेल्या दिल्लीत आता सरकार स्थापनेचे संकेत मिळू लागलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार स्थापनेचे निर्देश देण्यात आलेत. दुसरीकडे `आप`च्या उत्तरासाठी दोन दिवस राहिलेत. याविषयी आपनं दिल्लीकरांकडे एसएमएसच्या माध्यमातून प्रतिक्रिया मागितल्या आहेत.
Dec 21, 2013, 02:04 PM ISTबाप रे! `धूम-३`च्या एका तिकिटासाठी तुम्ही ९०० रुपये मोजणार?
आमीर खानचा ‘धूम ३’च्या तिकीटाची किंमत ऐकली तर तुम्हाला निश्चितच धक्का बसू शकतो... कारण, ‘धूम – ३’ सिनेमा पाहायचा असेल तर तुम्हाला एका तिकीटासाठी तब्बल ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.
Dec 19, 2013, 10:38 AM ISTसत्ता स्थापनेसाठी जनतेचं घेणार मत - केजरीवाल
दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर ‘आम आदमी पार्टी’नं पुन्हा एकदा जनतेचा दरवाजा ठोठावलाय. ‘आप’ आता जनतेकडे, दिल्लीमध्ये काँग्रेस किंवा भाजपसोबत सत्ता स्थापन करावी किंवा नाही, याबाबत सार्वमत घेणार आहे.
Dec 17, 2013, 04:24 PM ISTदिल्लीत येणार राष्ट्रपती राजवट, विधानसभा होणार बरखास्त?
दिल्लीमध्ये सरकार बनवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय. येत्या दोन दिवसांत म्हणजे १८ डिसेंबरपर्यंत दिल्लीत सरकार स्थापन झालं नाही. तर दिल्ली विधानसभा बरखास्त होऊन तिथं राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे.
Dec 16, 2013, 06:44 PM ISTजनलोकपाल मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध – राहुल
लोकपाल बील शेवटच्या टप्प्यात असून बील मंजूर करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिलीये. लोकपाल विधेयक राज्यसभेच मंजूर होण्याची आशा असल्याची माहिती अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. दिल्लीत पत्रकार परिषदेत काँग्रेसनं आपली भूमिका मांडली.
Dec 14, 2013, 08:37 PM ISTकेजरीवाल यांनी काँग्रेसला `आप` केले, सत्तेचा गोंधळ सुरू
नवी दिल्लीतील निवडणुकीनंतरचा गोंधळ सुरूच आहे. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेचा तिढा सुटणार की नाही, असेच दिसून येत आहे. काँग्रेसने आधी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या पाठिंब्याचे पत्र नायब राज्यपालांना दिले होते. परंतु आम्हाला बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही असे सांगणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसने देऊ केलेला बिनशर्थ पाठिंबा धुडकावला आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
Dec 14, 2013, 09:01 AM IST‘काँग्रेस’चा हात ‘आम आदमी पक्षा’ला साथ!
दिल्लीत काँग्रेसनं आम आदमी पार्टीला पाठिंबा दिलाय. दिल्लीच्या नायब राज्यपालांना याबाबतचं पत्र काँग्रेसनं आज रात्री सादर केलं.
Dec 13, 2013, 10:02 PM IST`आप`वाल्यांच्या गोंधळानं अण्णा भडकले!
आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी राळेगणमध्ये हंगामा केला... कालचा दिवस कुमार विश्वास यांच्या आरोपांमुळं गाजला, तर आज गोपाळ राय यांनी धिंगाणा केला... अखेर अण्णा हजारेंनीच कान उपटल्यानंतर आपच्या नेत्यांना बेआबरू होऊन राळेगणमधून काढता पाय घ्यावा लागला.
Dec 13, 2013, 07:09 PM IST