सेकंड इनिंग संपण्याआधी....पंतप्रधान आज बोलणार
२०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग प्रथमच आज पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच बोलणार आहेत. त्यातच पंतप्रधानपदाची सेकंड इनिंग संपण्याआधी ते मीडियाला सामोरे जात असल्यानं ते काय बोलतायत, याकडे सगळ्या देशाचंच लक्ष लागलंय.
Jan 3, 2014, 08:32 AM ISTअरविंद केजरीवालांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव
अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलंय. एकूण ३७ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव ‘आप’ सरकारनं जिंकला. विधानसभेत याबाबत मतदान पार पडलं.
Jan 2, 2014, 06:59 PM IST<B> <font color=red> LIVE : </font></b> अरविंद केजरीवाल यांची विश्वासदर्शक ठरावावर कसोटी
एकीकडे उत्तर भारत थंडीनं गारठला असताना दिल्लीत मात्र राजकीय वातावरण तापलंय. आज अरविंद केजरीवाल यांची खरी अग्नीपरीक्षा सुरू होतेय. आजचा विश्वासदर्शक ठराव जिंकण्याची त्यांची कसोटी लागणार आहे.
Jan 2, 2014, 08:55 AM IST...आणि ‘आप’चे मंत्री विधानसभेत पोहोचले रिक्षानं
दिल्ली विधानसभा अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. या अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी आम आदमी पार्टीचे सर्वच नवनियुक्त आमदार विधानसभेत पोहचले. कोणत्याही सरकारी सुविधेचा वापर न करण्याचा निर्धार आपच्या आमदारांनी केलाय.
Jan 1, 2014, 06:58 PM ISTदिल्लीकरांना नववर्षाचं गिफ्ट, तीन महिने पाणी फुकट
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीत मोफत पाणी पुरवठ्याचं आश्वासन पूर्ण केलंय. १ जानेवारीपासून मोफत पाणी पुरवठ्याची घोषणा करून दिल्लीकरांना नवीन वर्षाची भेट दिलीय.
Dec 30, 2013, 06:16 PM IST`आप` महाराष्ट्रात कोणाला करणार गप्प?
दिल्लीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीनं आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. देशभरातील सर्व ५४३ जागांवर लढण्यापेक्षा नेमक्या आणि मोजक्या (१००) जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचा त्यांचा विचार आहे.
Dec 30, 2013, 03:52 PM ISTआजारी असल्यानं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मारली दांडी!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तापाने फणफणले आहेत तसंच त्यांना डायरिया झाला असल्यानं ते आज कार्यालयात जाऊ शकणार नाहीत. केजरीवाल यांनी ट्विट करुन ही माहिती दिलीय.
Dec 30, 2013, 11:14 AM ISTअण्णांना आहे अरविंद केजरीवालांवर विश्वास!
दिल्लीत आज काँग्रेसच्या हाताचा आधार घेत आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीकरांना दाखवलेलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आज सरकार स्थापना केली.
Dec 28, 2013, 07:14 PM IST`आम आदमी` दिल्लीचे सरकार चालवेल - मुख्यमंत्री केजरीवाल
रामलीला मैदानात भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन केले. हा प्रवास आता सुरू झाला आहे. दिल्लीतील जनता हताश झाली होती. इथल्या राजकारणामुळे देश खड्ड्यात चालला होता. ही लढाई केजरीवालांना मुख्यमंत्री करण्यासाठी नाही. आम आदमीचे सरकार बनले आहे, पण आम्ही एकटे लढू शकत नाही. सर्वजण मिळून ही लढाई लढू शकतो. असे सांगत आज मी किंवा माझ्या सहा सहकाऱ्यांनीच नव्हे, तर दिल्लीच्या प्रत्येक माणसानं मंत्री आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
Dec 28, 2013, 01:02 PM ISTअरविंद केजरीवाल दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री
दिल्लीत काँग्रेस आणि भाजपला धक्का देत आम आदमी पार्टीने २८ जागा जिंकत चमत्कार केला. आम आदमीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. केजरीवाल हे सातवे मुख्यमंत्री आहेत.
Dec 28, 2013, 12:15 PM ISTमुख्यमंत्री शपथविधीसाठी केजरीवालांचा मेट्रोने प्रवास
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आज दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. थोड्या वेळापूर्वीच ते आपल्या गाझियाबाद इथल्या गिरनार अपार्टमेंट या घरातून रामलीला मैदानाकडे निघालेत. केंद्र सरकारच्या सीएनजी गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी त्यांनी मेट्रोनं प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
Dec 28, 2013, 11:12 AM ISTझी न्यूजचं सर्वात मोठं स्टिंग - ऑपरेशन सरकार
काँग्रेसच्या आमदारांनी समर्थन देण्यासाठी मागितले पैसे... पाहा सर्वात मोठा खुलासा...
Dec 27, 2013, 08:11 PM IST‘आप’चा पाठिंबा मागे घेऊ शकते काँग्रेस ?
दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष २६ डिसेंबर म्हणजे उद्या सरकार बनवत आहे. दुसरीकडे ‘आप’ला बाहेरून पाठिंबा देणारा काँग्रस पक्ष पाठिंबा काढून घेण्याच्या तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Dec 24, 2013, 08:24 PM ISTमंत्रिपद न मिळाल्यानं 'आप'मध्येही विद्रोहाचा सूर!
दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यापूर्वीच ‘आम आदमी पार्टी’मध्ये विद्रोहाचा सूर उमटलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर विधानसभेवरून निवडून आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षाशी विद्रोह करण्याच्या तयारीत आहेत.
Dec 24, 2013, 08:22 PM IST<B> केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांची नावं जाहीर... </b>
‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, हे आता पक्क झालंय.
Dec 24, 2013, 07:49 PM IST