`आप`च्या `नायक`चा एक महिना पूर्ण
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला आज एक महिना पूर्ण झाला. महिनाभरात आपच्या सरकारनं मतदारांना दिलेली काही आश्वासनं पूर्ण केली.
Jan 28, 2014, 11:16 PM ISTचालत्या कारमध्ये विवाहितेवर मित्राचा बलात्कार
पूर्व दिल्लीत एका चालत्या कारमध्ये २८ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच मित्रानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. स्थानिक लोकांनी महिलेला आनंद विहार बस टर्मिनलजवळ रडतांना बघून पोलिसांना माहिती दिली.
Jan 27, 2014, 10:17 AM ISTराजपथावर भारतानं दाखविली आपली ताकद
६५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक राजपथावर ध्वजारोहण आणि त्यानंतर भव्य परेडचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते इंडिया गेट इथल्या अमर जवान ज्योतीला मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर परेडला सुरूवात झाली.
Jan 26, 2014, 01:34 PM ISTआज कळणार भारताचं सामर्थ्य, `तेजस` मुख्य आकर्षण
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला.. त्यानंतर देश कोणत्या दिशेनं वाटचाल करणार, कोणत्या योजना राबवल्या जातील हे ठरवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं देशाची राज्यघटना बनवली. याचा देशानं संविधान म्हणून स्वीकार करुन लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. तो सोनेरी क्षण दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो...
Jan 26, 2014, 08:36 AM ISTमोदींकडून किती पैसे घेतले- सोमनाथ भारतींचा मीडियावर आरोप
आधीच छापा प्रकरणावरून वादग्रस्त राहीलेले दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती आज पुन्हा नव्या वादात सापडले. मीडियावर मोदींकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला. अखेरीस थोड्यावेळानं त्यांना समस्त पत्रकारांची माफी मागावी लागली.
Jan 25, 2014, 02:05 PM ISTकेजरीवाल...बिना हत्याराचा माओवादी - भाजप
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्द भाजपनं जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यसभेत विरोधी पक्ष भाजपचे नेते अरुण जेटली यांनी तर `अरविंद केजरीवाल हे बिना हत्याराचे माओवादी` असल्याचं म्हटलंय.
Jan 22, 2014, 10:27 AM IST९० रुपयांच्या चोरीची भोगली १३ वर्ष शिक्षा!
९० रुपयांची चोरी केल्याच्या आरोपानंतर तब्बल १३ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या एकाला हायकोर्टानं आज सोडलं. कदाचित चोरीप्रकरणी एका निर्दोष व्यक्तीला अटक केल्याचीही दिल्ली हायकोर्टानं व्यक्त केली.
Jan 20, 2014, 02:58 PM ISTजेव्हा मुख्यमंत्री आंदोलन करतात... तेव्हा नागरिकांचे हाल होतात...
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन सुरू केलंय.
Jan 20, 2014, 12:14 PM ISTप्रीती राठी अॅसिड हल्लाः आरोपी सापडला
मुंबईतल्या प्रीती राठी ऍसिड हल्ला प्रकरणातल्या आरोपीला अटक करण्यात आलीय. अंकूर पालीवाल असं या आरोपीचं नाव असून त्याला मुंबई क्राईम ब्रँचनं नवी दिल्लीत अटक केलीय.
Jan 17, 2014, 02:40 PM ISTवर्ल्ड रेकॉर्ड! किडनीतून निघाला ७०० ग्रामचा स्टोन
दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय महफूज अहमद नावाच्या व्यक्तीच्या किडनीतून जगातला सर्वात मोठा किडनी स्टोन काढण्यात आलाय. ९ सेमी व्यासाच्या या स्टोनचं वजन तब्बल ७०० ग्राम आहे.
Jan 16, 2014, 08:37 AM ISTधक्कादायक: दिल्ली पुन्हा हादरली, ५१ वर्षीय डेन्मार्कच्या महिलेवर गँगरेप
देशाची राजधानी पुन्हा हादरलीय. ५१ वर्षीय डेन्मार्कच्या महिलेवर दिल्लीत गँगरेप झाल्याची घटना घडलीय. मंगळवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ एका तरुणांच्या टोळीनं ही घ्रृणास्पद प्रकार केलाय.
Jan 15, 2014, 09:11 AM ISTकेजरीवाल यांचा ‘जनता दरबार’ बरखास्त
नागरिकांमध्ये रिअल ‘नायक’ म्हणून स्वतःला सिद्ध करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जनता दरबार बंद केला आहे. शनिवारी जनता दरबार भरवून प्रत्यक्ष लोकांच्या तक्रारी जाणून घेण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी घेतला होता. पण गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने जनता दरबार स्थगित करावा लागला होता.
Jan 13, 2014, 06:03 PM ISTअरविंद केजरीवालांच्या जीवाला धोका, माफिया मागावर
आपल्या ‘झाडू’नं भ्रष्टाचाराला साफ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आयबी अर्थात गुप्तचर विभागानं दिलीय. त्यामुळं आता केजरीवालांच्या भोवती सुरक्षा वाढविण्याची तयारी सुरू आहे.
Jan 13, 2014, 11:50 AM ISTविवाहापूर्वी 'सेक्स' अनैतिक, प्रत्येक धर्माला अमान्यच - कोर्ट
विवाहापूर्वी लैंगिक संबंध प्रस्थापित करणं ‘अनैतिक’ आणि ‘प्रत्येक धर्मानुसार चुकीचं’ असल्याचं मत दिल्लीच्या एका न्यायालयानं व्यक्त केलंय.
Jan 6, 2014, 08:37 AM IST<B> <font color=red>नरेंद्र मोदी:</font></b> जनतेचे आभार, त्यांनी एका चहावाल्याला मुख्यमंत्री केलं
नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर आज भारत स्वाभिमान ट्रस्टच्या स्थापना दिवसाच्या कार्य़क्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात योगगुरु रामदेवबाबांसोबत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका करत जनतेचे आभारही मानले आहेत.
Jan 5, 2014, 07:16 PM IST