bjp govt

नोटाबंदीचे चांगले परिणाम दिसताहेत - नितीन गडकरी

‘नोटाबंदीचे चांगले परिणाम अर्थव्यवस्थेत दिसत आहेत. अनेक बोगस कंपन्यांचे व्यवहार उघड झाले. भविष्यात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल’, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Nov 8, 2017, 10:51 AM IST

स्पेशल रिपोर्ट : नोटाबंदीने सत्ताधारी विरोधक आमने-सामने

देशाच्या अर्थकारणाला नवं वळण देणाऱ्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होतंय. यानिमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. जनतेच्या हाती मात्र फारसं काही आलेलं दिसत नाही. पाहुयात हा खास रिपोर्ट...

Nov 8, 2017, 09:01 AM IST

भाजप सरकारच्या नोटाबंदीची वर्षपूर्ती

देशाच्या अर्थकारणाला नवं वळण देणाऱ्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होतंय. आजच्याच दिवशीच भाजप सरकारने काळ्या पैशांना आळा घालण्यासाठी नोटाबंदीची घोषणा केली होती.

Nov 8, 2017, 08:03 AM IST

गोरखपूरची घटना सामुदायिक बालहत्याकांडच - उद्धव ठाकरे

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने तब्बल ७० मुलांचा नाहक बळी गेला आहे. मात्र इतक्या धक्कादायक घटनेवर यूपी सरकार मौन बाळगून आहे. अशात शिवसेनेने या घटनेवरून यूपी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या इस्पितळातील ७० मुलांचे मृत्यू म्हणजे सामुदायिक बालहत्याकांडच आहे, ही गरिबीची विटंबना आहे. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

Aug 14, 2017, 09:30 AM IST

महापालिकेच्या निकालावर फडणवीस सरकारचं भवितव्य...

 एका महत्त्वाच्या बातमीनं बातमीपत्राची सुरूवात करूयात....मुंबई महापालिकेच्या निकालांवरच फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असल्याचं चित्र राज्यात निर्माण झालंय. 

Feb 9, 2017, 06:01 PM IST

गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करावा - अजित पवार

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदीचा निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला केलंय. 

May 8, 2016, 02:25 PM IST