aurangabad

व्हॉटसअप, फेसबुकच्या जमान्यातही 'भोंडल्या'चा आनंद निराळाच!

आधुनिक भौतिक सुखात आपण आपले अस्सल पारंपरिक प्रथा विसरत जात आहोत... आजची पीढ़ी फेसबुक-व्हाट्सअॅपच्या चक्रात एवढी अड़कली आहे की 'भोंडला' काय आहे? हे अनेकांना माहितही नसेल... आपल्या भावी पिढीला आपली परंपरा माहीत व्हावी, या हेतूनेच अनाथ मुलींसाठी औरंगाबाद येथील सामाजिक संस्थांनी 'भोंडला' हा पारंपरिक खेळ आयोजित केला होता. ज्यामुळे अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुललाय. भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत काळाच्या ओघात भोंडल्याची परंपरा लोप पावत चालली आहे. ती जिवंत ठेवण्यासाठी आस्था जनविकास संस्था आणि सेवा फाऊंडेशननं हा उपक्रम साजरा केला. 

Oct 4, 2017, 08:17 PM IST

औरंगाबादमध्ये शिवसेनेचं महागाईविरोधात अनोखं आंदोलन

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचं कंबरड मोडलं आहे. वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेने आंदोलन केलं आहे.

Oct 2, 2017, 09:34 PM IST

अपंगांच्या नावाने पैसे उकळणाऱ्या दोन तरुणांना अटक...

औरंगाबादच्या एमजीएम कॉलेज कॅम्पसमध्ये अपंगांच्या नावाने पैसे उकळणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. 

Sep 27, 2017, 11:07 PM IST

धक्कादायक! रस्त्यावरच्या बिर्याणीत कुत्र्याचं मांस

रस्त्यावर स्वस्तात बिर्याणी खात असाल तर सावधान कारण तुम्ही खात असलेल्या बिर्याणीत कुत्र्याचं मांस असू शकते.

Sep 27, 2017, 04:20 PM IST

जायकवाडीचे १८ दरवाजे उघडले, पाण्याचा वेग वाढणार

जायकवाडी धरणाचे एकूण १८ दरवाजे मध्यरात्री उघडण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, तब्बल ९ वर्षानंतर जायकवाडी धरण ९६ टक्के भरलंय. त्यामुळे सुमारे १० हजार क्युसेक पाण्याचा गोदावरीच्या नदीपात्रात विसर्ग सुरु झालाय. 

Sep 22, 2017, 09:14 AM IST